पाकिस्तानचा माज उतरणार; तालिबान, बलुच आणि भारताच्या रणनीतीने पाकिस्तान बेजार
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानचे काळे कारनामे काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत. बहुतांशवेळा पाकिस्ताना त्याच्या कारनाम्यांमुळे तोंडघशी पडला आहे. जगभरातून पाकिस्तानला विरोध होत असतानाही पाकिस्तान शांत बसत नाहीयेत. अशातच पाकिस्तान आज एका भू-राजकीय “युद्ध त्रिकोणात” अडकला आहे. यात पाकिस्तानला नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक आघाडीवर नवीन आव्हाने उदयास येत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांची खुशामत करण्यास आणि त्यांच्यासोबत जेवणाची व्यवस्था करण्यास उत्सुक आहेत. आता त्यांचे त्यांच्या कथित मित्र तालिबानशीही कटू स्पर्धा झाली आहे.
पाकिस्तानचे २०२५चे प्रचार युद्ध अपयशी ठरताना दिसत आहे. पाकिस्तानने इस्लामिक उम्माला आवाहन करून तालिबान आणि बलुचिस्तानवर विजय मिळवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे, परंतु त्यांचा अजेंडा प्रत्येक वेळी अपयशी ठरला. या वर्षी, पाकिस्तानची अवस्था मात्र फारच गंभीर झाली आहे. पाकिस्तानला तीनही बाजूंनी हल्ले सहन करावे लागत आहेत. तीन बाजूंनी हल्ले सहन करावे लागत आहेत आणि त्यांच्या कृतींमुळे त्रिपक्षीय युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वेला पाकिस्तानचा भारताशी तणाव आहे आणि पश्चिम सीमेवर अफगाण तालिबानशी तीव्र संघर्ष सुरू आहे. तालिबानने डझनभर पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे आणि अनेक पाकिस्तानच्या चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. नैऋत्येकडे बलुचिस्तानच्या बंडखोरांनी केलेल्या केलेल्या बंडखोरीने पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं आहे.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज (PICSS) च्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या हिंसाचाराच्या घटना २०२४ च्या संपूर्ण वर्षाइतक्या झाल्या आहेत. या नऊ महिन्यांत ५०० हून अधिक दहशतवादी हल्ले झाले असून, शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. २०२५ च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा धोरणावरच नव्हे, तर त्याच्या अंतर्गत राजकीय स्थैर्यावरही गंभीर परिणाम होत आहेत.
ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिकेने त्यांचे सैन्य अफगाणिस्तानातून परत बोलवल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेवर आले. २०२१ मध्ये जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली तेव्हा पाकिस्तानने तालिबान सरकारचे स्वागतही केले. ज्या मुजाहिदीनांनी अफगाणिस्तानात तालिबान स्थापित करण्यास मदत केली होती तेच आता सत्तेत आल्याने त्यांची मैत्री वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती.
परिस्थिती आता पूर्णपणे उलटी झाली आहे. तालिबानने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील डुरंड रेषा मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी २०२१ मध्येच इशारा दिला होता की, “पाकिस्तानने जे अपेक्षित होते ते साध्य केले आहे, पण त्यानंतर त्यांना पश्चात्ताप होईल.” त्यांचे शब्द आता अक्षरशः खरे ठरत आहेत. तालिबानच्या सत्तेच्या पुनरागमनानंतर पाकिस्तानमधील अंतर्गत हिंसाचार झपाट्याने वाढला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आता पाकिस्तानसाठी एक मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे.
हुसेन हक्कानी पुढे म्हणतात, “अफगाणिस्तानशी युद्ध केल्याने पाकिस्तानच्या लोकांना काहीच फायदा होणार नाही. युद्धाचा कधीच लाभ होत नाही. तालिबान सत्तेत परतल्याचा आनंद साजरा करणे ही एक चूक होती, आणि आता त्यांच्या विरोधात संपूर्ण युद्ध छेडणे ही त्याहूनही मोठी चूक आहे.”
तालिबान आता आपल्या जुने मित्रसमूह तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध जाण्यास तयार नाही. अफगाण युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानचा तालिबानवरील प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. तालिबानलाही आता पाकिस्तानच्या पाठिंब्याची गरज उरलेली नाही.
पाकिस्तानी लष्करातील काही घटक अजूनही दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थिती बदलू इच्छित नाहीत, असा आरोप केला जात आहे. त्याचवेळी, तालिबानने पाकिस्तानवर आरोप केला आहे की इस्लामाबाद सरकार अफगाणिस्तानच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला मान्यता देत नाही. या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि तालिबानचे वरिष्ठ नेते अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत दौर्यामुळे पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे.
दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये रक्तरंजित चकमकी सुरू झाल्या आहेत. ९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या संघर्षात, पाकिस्तानी हवाई दलाने काबूलवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर तालिबानने डुरंड रेषेवर गोळीबार केला.
११ आणि १२ ऑक्टोबर रोजी अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर, चित्राल (खैबर पख्तूनख्वा) आणि बारामचा (बलुचिस्तान) या सीमाभागांत जोरदार चकमकी झाल्या. पाकिस्तानच्या दाव्यानुसार या लढाईत सुमारे २०० तालिबानी लढवय्ये ठार झाले, तर तालिबानच्या मते त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिक मारले. पाकिस्तानी लष्कराने मात्र ही संख्या २३ मृत सैनिकांपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगितले आहे.
बलुचांकडून होणारी बंडखोरी ही नैऋत्य पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरत आहे. बलुचिस्तानच्या मौल्यवान खनिज संसाधनांच्या गैरवापरावर बीएलए सारख्या बलुच बंडखोर संघटना संतप्त झाल्या आहेत. आता, पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानमधील दुर्मिळ मातीचे साहित्य अमेरिकेला विकण्याचा करार केला आहे. बलुच बंडखोर वारंवार पाकिस्तानी लष्करावर हल्ला करत आहेत.
फेब्रुवारी २०२५ मध्ये, ग्वादर बंदराजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात चार चिनी अभियंते मारले गेले. हा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) वर थेट हल्ला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये, क्वेटा येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १० जणांचा मृत्यू झाला. मार्च २०२५ मध्ये, बीएलएने जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले. बीएलएने इतर हल्ले केले आहेत.
बीएलएला भारताकडून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून वारंवार केला जातो. पण पाकिस्तानाने सातत्याने बलुच समुदायातील असंतोषाकडे दुर्लक्ष केलं आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत, ग्वादर, तुर्बत आणि क्वेट्टा येथे डझनभर बलुच हल्ले झाले, ज्यात चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले.