अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रक फेकल्याच्या निषेधार्थ ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा दिल्लीगेट परिसरात सभेमध्ये रूपांतरित झाला.या मोर्चात आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी नेते सहभागी झाले. भाषणादरम्यान संग्राम जगताप यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत स्क्रीनवरील व्हिडिओ-फोटो दाखवून, सुरुवात त्यांनी केली नसल्याचे स्पष्ट केले. तर गोपीचंद पडळकर यांनी शहरातील आणि जिल्ह्यातील नामांतरित ठिकाणांवरील जुनी नावे बदलून नवीन नावे लावण्याचे आवाहन केले. तसेच अहिल्यानगरात लव्ह आणि लँड जिहाद वाढल्याचेही पडळकर यांनी म्हटले.