गुजरातमधील कच्छ येथे बनावट कोलगेट फॅक्टरीवर छापेमारी करण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Gujarat Fake Colgate Company : गुजरात : रोजच्या दिनचर्येमध्ये टूथपेस्टने ब्रश करणे हे सवयीचे झाले आहे. यासाठी भारतीय अनेकदा कोलगेट कंपनीच्या पेस्टला प्राधान्य देतात. मात्र कोलगेटबाबत धक्कादायक बाब समोर आली. गुजरातमध्ये बनावट कोलगेटची फॅक्टरी आढळून आली. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कपुस्ती भागात ही मोठी घटना घडली आहे. यामुळे तुम्ही वापरत असलेली कोलगेट खरी आहे की बनावट आहे याबाबत जागृत राहण्याची गरज आहे.
गुजरातमधील कच्छमध्ये गोदोद्दार पोलिसांनी रापर तालुक्यातील चित्राड भागातील बनावट कोलगेट टूथपेस्ट बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. चार संशयितांना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी हुबेहुब वाटले अशा पद्धतीचे कोलगेट कंपनीचे टूथपेस्ट तयार केले जात आहे. जेव्हा पोलिस कारखान्यात पोहोचले तेव्हा त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. गुजरातमधील या बनावट कंपनीतून तब्बल 9 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
हो सकता है,
हम लोग रोज़ सुबह ज़हर से दाँत मंजन कर रहे है ।
यह नक़ली कोलगेट गुजरात के कच्छ में बन रहा है।
pic.twitter.com/kAbRWNWEAG — Dr. B L Bairwa MS, FACS (@Lap_surgeon) October 11, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या बनावट उत्पादन लाईनवरील टूथपेस्ट ट्यूब, पॅकेट्स आणि लेबलिंग हे सर्व खरे कोलगेटसारखेच होते. सर्व घटकांची तपासणी केल्यावर, त्यांचा रंग आणि वास यामध्ये भेसळ असल्याचे उघड झाले. आरोपींवर फसवणूक, कॉपीराइट उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याबद्दल औषध आणि ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.या घटनेने सर्वांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एका वापरकर्त्याने लिहिले की, “ही फॅक्टरी केवळ कोलगेटच बनवत नव्हती, तर सेन्सोडाइन आणि क्लोज-अप सारख्या ब्रँडची बनावट उत्पादने देखील बनवत होती. टॅब्लेट, मशीन्स, लेबल्स… सर्वकाही क्लोनसारखे होते. तुम्ही दररोज सकाळी चमच्याने दात स्वच्छ करत आहात, पण त्याची चव विषासारखी आहे.” असे नेटकऱ्यांने म्हटले.
गुजरातमधील या बनावट कोलगेट बनवणाऱ्या कंपनीची पोलिसांनी सखोल आणि चौकस चौकशी सुरु केली. पोलिसांनी घटनास्थळाहून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर बनावट उत्पादनाचे प्रमाण किती आहे… आणि राज्याच्या इतर भागात हे बनावट कोलगेट उत्पादन कुठे विकले जात होते हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहक व्यवहार संस्थांनाही या प्रकरणात सहभागी करण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेच, परंतु दैनंदिन उत्पादनांची चाचणी आणि प्रमाणन पूर्णपणे विश्वासार्ह आहे या विश्वासालाही धक्का बसला आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई, देखरेख आणि जबाबदारीच ग्राहकांचे संरक्षण करु शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.