ऑक्टोबरमध्ये ग्रह-गोचर, कसा होणार परिणाम
प्रत्येक महिन्यात आपल्या कुंडलीनुसार ग्रह तारे हे बदलत असल्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात असं ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते. आपल्या देशात ज्योतिषाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्या महिन्यात कोणता ग्रह कसा बदलतो याचा अभ्यास केला जातो आणि याच अभ्यासानुसार गुरूजी सिद्धेश मणेरीकर यांनी ऑक्टोबर २०२४ ग्रह गोचर कसे असेल याबाबत सांगितले आहे.
ऑक्टोबरमध्ये सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र यांसारखे महत्त्वाचे ग्रह त्यांच्या राशी बदलतील. सर्व प्रथम 10 ऑक्टोबर रोजी बुध हा ग्रह तूळ राशीत प्रवेश करमार आहे आणि त्यानंतर 13 ऑक्टोबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यानंतर 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल आणि शेवटी 20 ऑक्टोबरला मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल. कोणत्या राशीवर कसे परिणाम होतील आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
होणार राजयोग तयार
कसा होणार राजयोग
या ग्रहांच्या संक्रमणामुळे अत्यंत शुभ फळ देणारे राजयोगही तयार होतील. तूळ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग तयार होईल, जो ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. त्याचा काही राशींना नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हीही सध्या अनेक त्रासांनी दमला असाल तर नक्कीच आता तुम्हाला सुगीचे दिवस येणार आहेत असं समजा.
हेदेखील वाचा – ‘या’ आहेत भारतातील भगवान शंकराच्या भव्य मूर्ती; पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात
शनि बदलणार नक्षत्र
शनिची कशी असणार चाल
त्याचप्रमाणे शनीच्या हालचालीतही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:10 वाजता पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून निघून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. जिथे शनि 27 डिसेंबर 2024 पर्यंत मुक्काम करणार आहे आणि सर्व 12 राशीच्या लोकांना प्रभावित करेल असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हे ग्रह संक्रमण खूप भाग्यवान ठरतील.
वृषभ राशीसाठी उत्तम
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक प्रगती होणार आहे. तर पदोन्नती आणि नवीन नोकरी मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. आतापर्यंत तुम्ही खूपच वाट पाहिली असेल मात्र आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम मिळेल. तर व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.
हेदेखील वाचा – तळहातावर बुध पर्वत कोठे आहे, जाणून घ्या या पर्वताचे शुभ-अशुभ चिन्ह?
सिंह राशीच्या व्यक्तींना फायदा
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कसे असणार
सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरमधील ग्रह संक्रमणदेखील फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसंच जनमानसात तुमचा आदर वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. आतापर्यंत आलेला ताण कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मान मिळून प्रगती होईल
कन्या राशीसाठीही उत्तम
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसे असणार
कन्या राशीच्या लोकांना ऑक्टोबरमध्ये अनेक फायदे मिळतील. कन्या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आणि प्रशंसादेखील तुम्हाला मिळेल. वैयक्तिक आयुष्यही चांगले राहील. तुम्हाला सरप्राईज मिळू शकते. यामुळे तुमचे दिवस आनंदी जातील आणि तुम्ही खुष राहाल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.