फोटो सौजन्य- istock
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या अतुट बंधनाचे प्रतीक असलेला हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. या दिवशी बहिणी विशेष तयारी करतात. ज्यामध्ये ओवाळणीच्या ताटाला विशेष महत्त्व असते. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, जाणून घ्या
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरू होणार आहे. याची समाप्ती शनिवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. अशा वेळी उदय तिथीनुसार रक्षाबंधनाचा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी ताटामध्ये कुंकू किंवा रोली असणे सर्वात महत्त्वाचे आहे. राखी बांधण्याच्या सर्वांत आधी कुंकू किंवा रोली कपाळावर तिलक म्हणून लावले जाते. याला दीर्घायुष्य आणि विजयाचे प्रतीक देखील मानले जाते. मान्यतेनुसार यामुळे तुमचा सामजिक आदर देखील वाढतो.
ओवाळणीच्या ताटामध्ये कुंकू किंवा रोली सोबत तांदूळ असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तांदूळ हा शुभ मानला जातो. कोणत्याही पूजेमध्ये तांदूळाचा वापर अक्षता म्हणून केला जातो. भावाच्या कपाळावर तिलक लावल्यानंतर तांदळाचे दाणे लावले जातात. त्यासोबत तांदूळाचा संबंध शुक्र ग्रहाशी देखील असल्याचे मानले जाते.
ओवाळणीच्या ताटामध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. राखी बांधून झाल्यानंतर भावाला ओवाळावे. असे केल्याने भावाला वाईट नजर लागत नाही, अशी मान्यता आहे. त्यामुळे ओवाळणीच्या ताटामध्ये दिवा ठेवावा.
ओवाळणीच्या ताटामध्ये मिठाई किंवा एखादा गोड पदार्थ ठेवण्याला देखील विशेष महत्त्व आहे. राखी बांधून झाल्यानंतर भाऊ बहिणींनी एकमेंकाना मिठाई भरवावी. त्यामुळे नात्यामधील गोडवा वाढतो.
ओवाळणीच्या ताटामध्ये दिवा, मिठाईप्रमाणे नारळाला देखील महत्त्व आहे. या नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला तिलक लावल्यानंतर बहीण तिच्या भावाला नारळ देण्याची देखील काही ठिकाणी प्रथा आहे. नारळ हे देवी लक्ष्मीचे फळ मानले जाते. असे म्हटले जाते की, ओवाळून झाल्यानंतर भावाच्या हातात नारळ दिल्याने त्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)