फोटो सौजन्य- pinterest
घराची दिशा आणि उर्जेचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या रचनेबद्दल पाहिले गेल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. विशेषतः जेव्हा यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तूशास्त्रामध्ये पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशेला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जर या दिशेने अग्नि तत्व चुकीच्या पद्धतीने सक्रिय झाल्यास यकृताशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. वारंवार यकृताच्या समस्या येत असल्यास वास्तूचे करा हे उपाय, जाणून घ्या
वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेचा शरीराच्या एखाद्या भागाशी थेट संबंधित असतो. पूर्व-आग्नेय-पूर्व दिशेचे संबंध व्यक्तीच्या यकृताशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर या दिशेने अग्नि तत्व आवश्यकतेपेक्षा जास्त सक्रिय होतात. जसे की, गॅस स्टोव्ह, मिक्सर, ओव्हन किंवा पिठाची गिरणी यासारख्या यंत्रे ठेवली तर त्याचा परिणाम यकृतावर दिसून येतो. ज्या घरात ही दिशा खूप उष्ण असते तिथे राहणाऱ्या लोकांना यकृताशी संबंधित समस्या जसे की जळजळ, आम्लता, त्वचेची ॲलर्जी किंवा थकवा जाणवू शकतो.
जर या दिशेने जास्त उष्णता निर्माण होत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते.
जर मिक्सर, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी किंवा इतर कोणतेही मोटर आधारित उपकरण या दिशेने ठेवल्यास तर यकृताच्या समस्या वाढू शकतात.
जर एखाद्या कोपऱ्यामध्ये कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा सदोष वायरिंग असल्यास आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकतात.
पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.
शक्यतो भिंतीला हलका हिरवा किंवा निळा रंग लावावा
त्या जागेवर मनी प्लांट किंवा तुळस सारखी हिरवी झाडे ठेवावी.
पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशेला स्वयंपाकघर, गॅस, ओव्हन या गोष्टी ठेवू नका.
त्याचप्रमाणे या दिशेला इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका.
तसेच या दिशेच्या भिंतीला लाल किंवा गडद नारिंगी रंग वापरू नका.
बऱ्याचदा आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यावेळी आपण औषधांचे सेवन करतो. औषधांचा संबंध आहाराशी जोडलेला असल्याचे मानले जाते. मात्र कधीकधी समस्येचे मूळ आपल्या घराच्या दिशेने लपलेले असते. त्यामुळे यकृताचा थेट संबंध शरीराच्या उर्जेशी असतो आणि जर ही दिशा योग्य असल्यास आपल्या अनेक शारीरिक समस्या आपोआप दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)