फोटो सौजन्य - सोशल मीडिया
देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असून, बदलत्या हवामानालाही तोंड देऊ शकणारी दर्जेदार कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला, औद्योगिक विकासाला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्ताराला व शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्योन्मुख नियोजन करण्यात येत आहे. सासवड-पुरंदर विमानतळ, वाढती वाहतूक व शहराचा विस्तार विचारात घेऊन पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात ३०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या सायकल मार्गांच्या विकासालाही गती देण्यात येणार असल्याचे श्री. भोसले म्हणाले.
बांधकाम परवानगी प्रक्रियेत अचूकता येणार; पुणे महापालिकेने लागू केली API सिस्टिम
या प्रकल्पांमध्ये चौपदरी, सहापदरी व उन्नत मार्गांचा समावेश असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लांबीचा उन्नत मार्ग निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्याने उभारलेल्या विविध पायाभूत सुविधांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख निर्माण केल्याचे मंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.
यावेळी आमदार उमाताई खापरे, आमदार सर्वश्री योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतनजी तुपे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंतजी रासने, शंकरजी मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके माऊली, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.
तिन्ही रस्ते प्रकल्पाचे वैशिष्ट्य
पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या ३१ किलोमीटरमध्ये सहा पदरी उन्नत महामार्ग, तर स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे.
उन्नत महामार्गाच्या सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.
हडपसर-यवत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये सुमारे २५ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि सहा पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा मार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रवास सुलभ व सुरक्षित होईल.
शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील
तळेगाव-चाकण-शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत सुमारे २६ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर लांबीचा चार पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.






