नारळी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व (फोटो सौजन्य-ट्विटर)
नारळी पौर्णिमेचा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांकडून साजरा केला जातो. श्रावणात पावसामुळे समुद्र प्रचंड खवळलेला असतो आणि बोट, जहाजांची वर्दळ या वेळी बंद असते. दरम्यान खवळलेल्या समुद्राचा कोप होऊ नये आणि वरुणदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
हेदेखील वाचा- तुम्हीही खूप मसालेदार पदार्थ खाता का? जाणून घ्या तिखट खाण्याचे तोटे
नारळी पौर्णिमा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा नारळी पौर्णिमा सोमवार, 19 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. नारळी पौर्णिमा तिथी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि याच दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल.
नारळी पौर्णिमा पूजा पद्धत
नारळी पौर्णिमा हा सण मच्छीमारांचा आहे. या दिवशी लोक फल्हारी व्रत पाळतात आणि वरुण देवाची पूजा करतात. या व्रताच्या वेळी उपवास करणारे वरुण देवाला नारळ अर्पण करतात. या व्रताने ममुद्रा देव प्रसन्न होतात, अशी या व्रतामागची श्रद्धा आहे. असे मानले जाते की, हे व्रत पाळल्याने वरुण देव समुद्रात होणाऱ्या अप्रिय घटना टाळतात. हे व्रत श्रावण महिन्यात येत असल्याने भगवान शिवाचीही पूजा केली जाते.
हेदेखील वाचा- बाजाराची नाही, तर स्वतःच्या हाताने राखी बनवायची आहे का? घरच्या घरी राखी कशी बनवायची जाणून घ्या
नारळी पौर्णिमेचे महत्त्व
हा उपवास समुद्रातील मासेमारीच्या हंगामाची सुरुवात मानला जातो. यामुळेच मच्छीमार समाज या दिवशी तिची विशेष पूजा करतात आणि शक्य तितके मासे पकडण्यासाठी भगवान वरुणाकडून आशीर्वाद प्राप्त करतात.
समुद्राची पूजा केली जाते
नारळी पौर्णिमेचा सण प्रामुख्याने समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या मासेमारी बांधवांकडून हा सण साजरा केला जातो. श्रावणात पावसामुळे समुद्र प्रचंड खवळलेला असतो आणि बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. हा काळ माशांचा प्रजनन काळ असल्याने या काळात मासेमारीदेखील थांबवलेली असते. दरम्यान, खवळलेल्या समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका, सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा आणि वरुणदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. कोळी बांधव समुद्राला यशाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतात.
नृत्यासह विशेष नैवेद्य
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र आणि बोटीला नैवेद्य दिला जातो. यावेळी नैवेद्य म्हणून नारळाच्या करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी रावस माशांचा तळलेला तुकडादेखील नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. त्यानंतर कोळी बांधव पारंपरिक गीत गायन, मिरवणूक, नृत्य, नारळ फोडण्याच्या खेळासह विविध स्पर्धा आयोजित करतात.