Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांची कथा, आदर्श गुरु-शिष्य परंपरेचा तेजस्वी आदर्श

भारतीय संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम कल्याणस्वामी यांची गुरु-शिष्य जोडी अत्यंत प्रेरणादायी मानली जाते. ही कथा केवळ भक्तीची नाही, तर निष्ठा, आज्ञापालन आणि पूर्ण समर्पणाची आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 27, 2026 | 01:15 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांची कथा
  • आदर्श गुरु-शिष्य परंपरेचा तेजस्वी आदर्श
  • आदर्श गुरु-शिष्य नात्याचे मूर्तिमंत उदाहरण
 

समर्थ रामदास स्वामींची जयंती दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे श्रीराम नवमीला साजरी केली जाते. १६०८ मध्ये जांब (जि. जालना) येथे जन्मलेले नारायण सूर्याजी ठोसर हे शिवरायांचे आध्यात्मिक गुरू, दासबोधकार आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेल्या समर्थांनी महाराष्ट्रात रामोपासना, स्वधर्मनिष्ठा व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. त्यानिमित्ताने त्यांच्या एका निस्सीम शिष्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया.

आदर्श गुरु-शिष्य नात्याचे मूर्तिमंत उदाहरण

समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.

Swapna Shastra: स्वप्नात या गोष्टी दिसल्यास कोणालाही सांगू नका, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

गुरूभक्ती आणि सेवेमुळे घडलेले महान व्यक्तिमत्त्व

गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यातीलच एक होते कल्याणस्वामी! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुर्वाज्ञा प्रमाण मानून कुर्‍हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, अंबाजी, कल्याण आहे ना? हो, कल्याण आहे स्वामी !, विहिरीतून उत्तर आले. चल ये तर मग वरती. समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला कल्याण या नावाने हाक मारू लागले.

Swami Narayan Jayanti: सेवा, श्रद्धा आणि समर्पण, स्वामीनारायण जयंतीचे काय आहे महत्त्व

गुरूकृपेने मिळालेली आध्यात्मिक उंची

समर्थ रामदासस्वामी सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी प्रतिदिन त्यांच्या स्नानासाठी उरमोडी नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पाहायला मिळतात. ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थांनी कल्याणस्वामींकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्याबरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधीअवस्थेची अनुभूती दिली होती.

वर्ष १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली. जेव्हा समर्थ रामदासस्वामींनी वर्ष १६८१ मध्ये समाधी घेतली, त्यावेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकूळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्यानंतर मात्र कल्याणस्वामी सज्जनगडावर कधीही गेले नाहीत; कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. वर्ष १७१४ मध्ये योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे देह ठेवला.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाते कसे होते?

    Ans: हे नाते अत्यंत श्रद्धा, निष्ठा आणि पूर्ण समर्पणावर आधारित होते. कल्याणस्वामींनी गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून आदर्श शिष्यत्व दाखवले.

  • Que: कल्याणस्वामींचे मूळ नाव काय होते?

    Ans: कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी होते. गुरूंच्या कृपेने त्यांना “कल्याण” हे नाव मिळाले.

  • Que: या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते?

    Ans: गुरूभक्ती आणि आज्ञापालनाचे महत्त्व, निःस्वार्थ सेवा आणि समर्पण, श्रद्धेमुळे मिळणारी आध्यात्मिक उंची

Web Title: The story of kalyan swami and samarth ramdas swami a glorious example of the ideal guru disciple tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.