फोटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्र केवळ घराच्या सजावटीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देत नाही तर घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग देखील आहे. आपल्या जीवनातील आनंद, शांती आणि समृद्धी थेट घराच्या वातावरणाशी संबंधित आहे आणि वास्तुशास्त्र या नात्याचे खूप काळजीपूर्वक नियंत्रण करते. घरात आरशांचा वापर वास्तूमध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे.
घरात अनेक आरसे लावल्यास काय होईल, जाणून घ्या
वास्तूशास्त्रानुसार, घरात आरसा लावताना दिशेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बेडरुमसमोर आरसा लावू नये. कारण यामुळे नात्यामध्ये तणाव येऊ शकतो.
वास्तूमध्ये दिशेप्रमाणेच आरशाच्या आकाराला देखील महत्त्व आहे. आरशाचा आकार नेहमी गोल किंवा आयताकृती असावा. त्रिकोणी किंवा इतर असामान्य आकाराचे आरसे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात. याशिवाय, आरसा खूप मोठ्या आकारात बसवू नये कारण त्यामुळे उर्जेचे असंतुलन निर्माण होऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात असलेले आरसे नेहमी स्वच्छ असावेत. घाणेरडे आणि अस्पष्ट आरसे घराचे सौंदर्य कमी करतातच पण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होऊ शकते. स्वच्छ आरसा घरात सकारात्मकता पसरवतो आणि मानसिक शांती देखील प्रदान करतो.
स्वयंपाकघरात शक्यतो आरसा लावू नये. स्वयंपाक घरात आरसा असल्यास आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्वयंपाकघरात आरसा असल्यास त्याचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर विपरित परिणाम होऊ शकतो.
वास्तूशास्त्रानुसार आरसा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. उदाहरणार्थ, जर बेडरूममधील आरसा बेडसमोर असेल तर तो व्यक्तीच्या झोपेत अडथळा आणू शकतो आणि मानसिक ताण वाढवू शकतो. या कारणास्तव, बेडरूममध्ये आरसा कधीही डोक्यासमोर ठेवू नये.
बाथरूममधील आरसे फक्त वॉशबेसिनच्या वरच लावावेत. मात्र, आरसा वॉशबेसिनच्या समोर नसावा याची खात्री करणे आवश्यक आहे. याशिवाय बाथरुममधील आरसा खूप मोठा असू नये किंवा त्याला गंज लागलेला असू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
घरात एकापेक्षा अधिक आरसे लावल्यास घरातील ऊर्जेचे असंतुलन निर्माण होण्याची शक्यता वाढते. एकापेक्षा जास्त आरशांमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि नकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. म्हणूनच घरात जास्त आरसे वापरणे टाळावे.
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये आरसा योग्य ठिकाणी लावल्यास त्यातील सकारात्मक उर्जेचा प्रवाह देखील सुनिश्चित करू शकतो. म्हणून, या वास्तू टिप्सचे पालन करून तुम्ही तुमचे घर केवळ सुंदरच नाही तर शांत आणि समृद्ध देखील बनवू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)