फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार, 28 जुलै रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील आहे. तसेच रवि योग आणि भाद्र योग 12 तास असणार आहे. या दिवशी रवी योगामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाणार आहे. विनायक चतुर्थीला गणेश भक्त उपवास देखील करतात. त्यांच्या कृपेने सर्व कामे यशस्वी होतात. त्यासोबतच सर्व जीवनात येणीरी सर्व अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते. यावेळी श्रावण महिन्यातील विनायक चुतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि योग जाणून घ्या
पंचांगानुसार, विनायक चतुर्थीचे व्रत श्रावण शुक्ल चतुर्थी तिथी म्हणजे रविवार, 27 जुलै रोजी रात्री 10.41 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 28 जुलै रोजी रात्री 11.24 वाजता होईल. उद्यतिथीनुसार हे व्रत सोमवार, 28 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
यावेळी विनायक चतुर्थी पहिल्या श्रावणी सोमवारी आलेली आहे. या शुभ योगामध्ये भगवान शिव, देवी पार्वती आणि गणपती बाप्पाची विधीवत पूजा केली जाणार आहे. श्रावण महिना हा शिव परिवाराच्या पूजेसाठी ओळखला जातो. यावेळी विधीवत पूजा केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते, असे म्हटले जाते.
सोमवार, 28 जुलै रोजी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सोमवारी सकाळी 11.6 ते दुपारी 1.49 पर्यंत राहील. या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी 2 तास 43 मिनिटांचा एकूण अवधी राहील. चतु्र्थीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.17 ते 4.59 पर्यंत असेल. तर अभिजीत मुहूर्त दुपारी 12 ते 12.55 पर्यंत असेल.
जुलै महिन्यातील विनायक चतुर्थी रवी योगात आहे. विनायक चतुर्थीला सकाळी 5.40 वाजल्यापासून रवी योग तयार होत आहे. जो योग संध्याकाळी 5.35 पर्यंत राहील. याशिवाय पहाटेपासून दुपारी 2.54 वाजेपर्यंत परिघ योग राहील. त्यानंतर शिवयोग देखील तयार होणार आहे. हा योग संपूर्ण रात्रभर राहणार आहे. व्रताच्या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सकाळपासून सायंकाळी 5.35 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर उत्तराफाल्गुनी नक्षत्र सुरु होईल.
विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रा असेल. यावेळी भद्राचा कालावधी सुमारे 12 तास राहील. भद्रा सकाळी 10.57 वाजता सुरू होईल आणि रात्री 11.24 पर्यंत राहील. भद्रा पृथ्वीवर वास करेल. भद्रादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. दरम्यान, गणपती बाप्पाची पूजा करण्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)