फोटो सौजन्य- istock
पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणून मानला जातो. यावेळी हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. यावेळी बहीण आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. भाऊ देखील आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. ओवाळून राखी बांधून झाल्यानंतर भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर बहिणीच्या राशीनुसार तिला भेटवस्तू दिल्यास नात्यामधील गोडवा टिकून राहतो. रक्षाबंधनाच्या दिवशी राशीनुसार कोणत्या भेटवस्तू द्याव्यात जाणून घ्या
रक्षाबंधनाच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना लाल रंगाच्या वस्तू भेट म्हणून द्यावे. म्हणजे लाल कपडे, लाल पर्स किंवा इतर कोणतीही लाल वस्तूशी संबंधित गोष्टी आपल्या बहिणीला भेट म्हणून द्यावी.
रक्षाबंधनाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना चांदीच्या वस्तू जसे की पैंजण, अंगठी. त्याचप्रमाणे सुगंधित परफ्यूम देखील भेट देऊ शकता.
मिथुन राशीच्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या, दुपट्टा किंवा हँडबॅग भेट म्हणून देऊ शकता.
कर्क राशीचे लोक खूप भावनिक असतात. या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी चांदीचे नाणे किंवा अंगठी देणे अत्यंत शुभ मानले जाते.
जर तुमच्या बहिणीची सिंह रास असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी तिला सोन्याचे छोटे दागिने किंवा चमकदार ड्रेस किंवा यांसारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
कन्या राशीच्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा इतर कोणतीही हिरव्या रंगांची वस्तू भेट देणे शुभ राहील.
तूळ राशीच्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही देवी देवतांची मूर्ती भेट देणे चांगले राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी लाल धाग्यापासून बनवलेली वस्तू, कापड किंवा माणिकांशी संबंधित वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
धनु राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा सोन्याची अंगठी भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते.
मकर राशीच्या लोकांनी रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला गॅझेट, मोबाईल किंवा पारद शिवलिंग सारखे धार्मिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित काहीतरी भेट म्हणून देऊ शकता.
जर तुमच्या बहिणीची कुंभ रास असल्यास तिला निळ्या रंगांचा ड्रेस, बॅग किंवा घराच्या सजावटी संबंधित कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
जर तुमच्या बहिणीची मीन रास असल्यास तिला पितळेच्या वस्तू, पिवळे कापड किंवा पिवळ्या रंगांच्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)