फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात विश्वकर्मा पूजेला खूप महत्त्व आहे. ही पूजा भगवान विश्वकर्मा यांना समर्पित आहे. त्यांना देवांचे शिल्पकार आणि कारागीर मानले जाते. हा उत्सव दरवर्षी कन्या संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी कधी आहे विश्वकर्मा पूजा आणि पूजेचे महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी पहाटे 12.21 वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.39 वाजता ही तिथी संपणार आहे. पंचांगानुसार 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा केली जाणार आहे. ज्यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये 16 सप्टेंबर रोजी रात्री 1.47 वाजता प्रवेश करणार आहे.
पूजा करण्याच्या आधी सर्व अवजारे, यंत्रे आणि कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावी.
सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर पूजेचा संकल्प करा.
भगवान विश्वकर्माची मूर्ती वेदीवर स्थापित करा.
पूजा करताना फुले, तांदूळ, रोली, चंदन, हळद, दिवा, धूप, फळे आणि मिठाई इत्यादी गोष्टींचा समावेश करा.
त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करुन घ्या. नंतर भगवान विश्वकर्माला तिलक लावा आणि फुलांची माळ अर्पण करा.
तुमच्या सर्व अवजारांवर आणि यंत्रांवर तिलक लावून त्यांची पूजा करा.
त्यावर फुले आणि तांदूळ अर्पण करा.
तुमच्या सर्व अवजारांवर आणि वाद्यांवर टिळक लावून त्यांची पूजा करुन घ्या
त्यानंतर त्यावर तांदूळ अर्पण करा.
त्यांनी स्वर्ग लोक, द्वारका नगरी आणि इंद्राचे वज्र यासह अनेक दैवी रचना बांधल्या. विश्वकर्मा यांना सर्व सृष्टीच्या यांत्रिक आणि स्थापत्य कलाकृतींचे जनक मानले जाते. हा सण कारागीर, अभियंते आणि यंत्रांशी संबंधित कामाच्या ठिकाणी याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या यंत्रांची, अवजारांची आणि कारखान्यांची पूजा करतात. त्याचसोबत लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करणाऱ्यांनी ही पूजा करावी त्यामुळे कामामध्ये प्रगती होते. असे म्हटले जाते की, भगवान विश्वकर्मा यांनी भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र देखील निर्माण केले.
विश्वकर्मा पूजेच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ खाणे चांगले मानले जात नाही. त्याचसोबत कोणालाही दुखावणे, अपमान करणे आणि वाईट बोलणे टाळावे. तसेच या दिवशी मंत्रांचा जप करणे चांगले मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)