फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये अश्विन महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिनी देवी दुर्गेला समर्पित आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत देवी दुर्गा पृथ्वीवर वास करते, असे म्हटले जाते. या काळात शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यावेळी भक्त नऊ दिवस उपवास देखील करतात. असे म्हटले जाते की, देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत नेमके कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व, जाणून घ्या
प्रदोष व्रत हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षामधील त्रयोदशी तिथीला आणि शुक्ल पक्षाच्या दिवशी पाळले जाते. हा दिवस महादेवांना समर्पित असतो. यावेळी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी भक्त उपवास देखील करतात. यामुळे साधकाला उपवासाचे पूर्ण फळ मिळते.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी रात्री 11.24 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.36 वाजता होणार आहे. त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात महादेवांची पूजा केली जाते. यावेळी आश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत 19 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदय – सकाळी 6.8 वाजता होईल. तर सूर्यास्त – संध्याकाळी 6.21 वाजता होईल. यावेळी ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04:34 ते 05:21 वाजेपर्यंत असेल. विजया मुहूर्त – दुपारी 02:17 ते 03:06 पर्यंत राहील. गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 06:21 ते 06:45 पर्यंत राहील. निशिता मुहूर्त – दुपारी 11:51 ते 12:38 वाजेपर्यंत असेल.
शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे.
त्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन महादेवाला अभिषेक करुन व्रत करण्याची प्रार्थना करा.
प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळी पूजा केली जाते.
त्यानंतर तुपाचा दिवा लावून आणि शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करावा.
प्रदोष व्रताचे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते, अशी मान्यता आहे. हे व्रत पाळल्याने भौतिक आणि सुख साधनांमध्येही वाढ होते. त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने तुम्हाला अनेक फाजदे होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)