फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक होताना दिसून येतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात त्यावेळी इतर ग्रह एकाच राशीमध्ये आधीच उपस्थित असतात. त्यामुळे दोन्ही ग्रह एकत्र येऊन शुभ आणि अशुभ योग देखील तयार होतात. सप्टेंबर महिन्यामध्ये शुक्रादित्य राज योग तयार होणार आहे ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र यांचे सकारात्मक परिणाम काही राशीच्या लोकांवरच होताना दिसून येणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
सप्टेंबरचा महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टिकोनानुसार विशेष असल्याने यावेळी सूर्य त्याच्या स्वतःच्या सिंह राशीमध्ये राहील. ज्यावेळी सूर्य शुक्र 15 सप्टेंबर रोजी संक्रमण करणार आहे. यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. हा योग खूप शुभ मानला जातो. त्याचा सकारात्मक परिणाम कर्क, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांवर अधिक होणार आहे.
कर्क राशीच्या लोकांना या संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे. यावेळी तुमचे भौतिक सुखसोयी देखील वाढतील. तसेच करिअर आणि व्यवसायात देखील प्रगती करतील. या काळात वाहन, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे त्यांना अनेक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. त्यासोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल.
सिंह राशीच्या लोकांवर या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. व्यवसायात केलेली गुंतवणूक दुप्पट नफा देऊ शकते, बौद्धिक कामात यश मिळेल. या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. न्यायालयीन प्रकरणांचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. या काळात मालमत्ता, वाहन किंवा जमीन खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो जो तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतो. या काळात पालकांचे आरोग्य खूप चांगले राहील. तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)