पाण्याच्या राक्षसाची गजराजाशी जबरदस्त झुंज! हत्ती पाण्यात शिरताच मगरीने सोंड धरली अन्...; थरारक दृश्याचा Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याल पाहायला मिळतात. गेल्या काही काळाती वन्यजीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये प्राण्यांच्या दैनंदिन जीवनमाचे, शिकारीचे, अन्नाच्या शोधाचे, प्राण्यांचे मस्ती करतानाचे असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत आहे. अगदी डिस्कव्हरी चॅनेल बघत असल्यासारखे वाटत राहते. सध्या असाच एक हात्ती आणि मगजीच्या झुंजीचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ इतका रोमांचक आहे की, तुम्ही पूर्ण पाहिल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये?
जंगलात कधी कोणत्या प्राण्यावर कुठून आणि कसे संकट ओढावेल सांगता येते नाही. येथे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारुन खाणार हे निश्चितच आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील दृश्य देखील असेच काहीसे आहे. यामध्ये मगरीने हात्तीवर हल्ला केला असून हात्तीने देखील त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. हात्ता हा जंगालाचा सर्वात ताकदवान आणि भव्य प्राणी आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तींचा एक कळप नदीकाठी पाणी पिताना दिसत आहे.
एक हत्ती शांततेने पाणी पित आहे. याच वेळी त्याच्यावर अचानक हल्ला होतो. हत्ती सोंडेने पाणी घेतल असताना मगर अचानक त्याच्या सोंडेला जबड्यात पकडते आणि त्याला चावण्याचा प्रयत्न करते. परंतु मगरीची ही चूक तिला महागत पडते. हत्ती आपल्या सोंडेने तिला गरागरा फिरवतो आणि पाण्यात फेकतो, पण तरीही ती हार मानत नाही. यावेळी मात्र हत्ती तिच्यावर पाय देतो आणि आपली सोंड मगरीच्या तावडीतून सोडवतो. सध्या या थरारक झुंजीता व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध
व्हायरल व्हिडिओ
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheeDarkCircle या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत, असे थरारक दृश्य रोज पाहायला मिळतात. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, प्राण्यांच्या जीवनातही किती संघर्ष आहे, तर दुसऱ्या एकाने जंगलाचा खरा राजा हा गजराजच आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने भाऊ एका झटक्यात खेळ संपवला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.