मुंबई: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आहे. या हाणामारीचे कारण प्रॉपर्टीच्या वादातून झाले आहे. लालजीपाडा येथील यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये जागेच्या ताब्यासंधर्भातील वाद इतका वाढला की, त्याचे रूप हाणामारीत बदलले. या मारामारीत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रॉपर्टीवरून वाद सुरु होता. या वादातूनच दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये बॅट, हॉकी स्टिक, लाकडी काठ्या, विटा आणि दगडांचा वापर करण्यात आला.
आठ जण गंभीर जखमी
या हाणामारीत आठ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान राम लखन यादव (वय 65) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आहे. तीन आरोपींना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर लालजीपाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने महागाव हादरले;खिडक्यांच्या काचा फुटल्या अन्…
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. स्फोटात घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या होत्या. यामुळे घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा खच पाडला होता. घटना समजताच बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महागावतील परीट गल्लीत कापड व्यावसायिक सुनील खटावकर यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबात दोन लहान मुलासह आठजण राहतात. घटनेच्या अगोदर श्री खटावकर हे दुकानात होते. पत्नी घरीच होती. स्फोट झाल्यानंतर शेजारील मुलाने माहिती दिली. घरी आल्यानंतर पत्नीला विचारले, तेव्हा तिने आम्ही सर्वजण गणपतीच्या आरतीला गेलो होतो, असे सांगितले. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदरच्या घटनेबाबत आपली कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे खटावकर यांनी पोलीसांना सांगितले आहे. दरम्यान, बीट हवलदार आर.वाय. नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास भोसले, मंडल अधिकारी आर.के. तोळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.