Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

Krishna Janmashtami 2026: हिंदू धर्मात जन्माष्टमीला विशेष महत्त्व असून या दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 03:25 PM
Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ४ सप्टेंबर २०२६ रोजी जन्माष्टमीचा उत्सव
  • मध्यरात्री कृष्ण जन्माचा सोहळा होणार
  • ‘कृष्ण’ नावामागची कथा आणि अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता
हिंदू धर्मात जन्माष्टमीचा सण सगळ्यात मोठा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री कृष्ण जन्म झाला अशी आपली मान्यता आहे. सगळ्या देशात हा उत्सव लोक खूप आनंदाने आणि भक्तीने साजरा करतात. मंदिरांमध्ये रात्री १२ वाजता कृष्ण जन्माचा सोहळा होतो, भजन, कीर्तन, आरती होते, बाळकृष्णाला पाळण्यात ठेवले जाते.

यंदाची जन्माष्टमी जवळच आली आहे. पण एक प्रश्न कधी तुमच्या मनात येतो की कृष्ण हे नाव त्याला कोणी दिलं?यंदा जन्माष्टमी कधी आहे? २०२६ मध्ये जन्माष्टमी शुक्रवारी, ४ सप्टेंबरला आली आहे. हा दिवस भाद्रपद महिन्यातील अष्टमीचा आहे. मुख्य पूजा मध्यरात्री होईल. सगळीकडे या दिवशी उपवास करून रात्री कृष्ण जन्म साजरा केला जाईल. कृष्णाचे नाव कोणी ठेवले?श्रावण महिना हा कृष्ण भक्तीसाठी खास असतो. कृष्णाचा जन्म याच महिन्याच्या आसपास अष्टमीला झाला म्हणून या महिन्याला जास्त महत्त्व आहे. Krishna Janmashtami 2026:

श्रीकृष्णाचे नामकरण कोणी केले? 

महर्षी गर्गाचार्य यांनी कृष्णाचे नाव ठेवले . त्यांना गर्ग मुनी म्हणून पण ओळखतात. ते यादव कुळाचे कुलगुरू होते. त्यामुळे नवीन बाळाचे नाव ठेवण्याचा अधिकार त्यांचाच होता. पण ही गोष्ट साधी सरळ नव्हती. यामागे एक मोठी गुप्तता होती. आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल. कंसाने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकले होते. आणि त्यांच्या सात मुलांना मारले होते.

यशोदा मातेकडे नेऊन ठेवले

जेव्हा आठवा मुलगा म्हणजे कृष्ण जन्माला आला तेव्हा वासुदेवाने रातोरात त्याला यमुना ओलांडून गोकुळात नंदबाबा आणि यशोदा मातेकडे नेऊन ठेवले. त्यामुळे नंदबाबांच्या घरी दोन मुले होती, एक रोहिणीचा मुलगा बलराम आणि दुसरा यशोदेकडे कृष्ण आलेला होता. नंदबाबांना वाटले की, आपल्या मुलांचे नामकरण मोठ्या थाटात करूया. त्यांनी गर्गाचार्यांना गोकुळात बोलावले.

पण गर्गाचार्यांना एक भीती होती. जर मी उघडपणे गोकुळात गेलो आणि नामकरण केले तर कंसाला संशय येईल. कंसाला कळेल की देवकीचा मुलगा जिवंत आहे आणि गोकुळात आहे.म्हणून गर्गाचार्यांनी एक युक्ती केली. ते कोणाला न सांगता लपत छपत गोकुळात गेले. त्यांनी नंदबाबांना सांगितले की हा सोहळा गुपचूप करूया, कोणताही मोठा कार्यक्रम नको.

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

मुलाचे नाव बलराम ठेवले

मग गायीच्या गोठ्यात, सगळ्यांपासून लपून हा नामकरण विधी झाला. तिथे गर्ग मुनींनी दोन्ही मुलांची नावे ठेवली. रोहिणीच्या मुलाचे नाव बलराम ठेवले कारण तो खूप बलवान होणार होता. आणि त्याचे दुसरे नाव संकर्षण पण ठेवले.आणि दुसऱ्या मुलासाठी ते म्हणाले, या मुलाने याआधी अनेक युगात वेगवेगळे अवतार घेतले आहेत. कधी तो पांढरा होता, कधी लाल होता, कधी पिवळा होता.

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

आता या युगात तो काळ्या रंगात म्हणजे कृष्ण वर्णात जन्माला आला आहे, म्हणून याचे नाव कृष्ण असेल.कृष्ण म्हणजे काळा, जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो तो.अशा प्रकारे जगाचा तारणहार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे नाव एका गोठ्यात, अगदी साधेपणाने आणि गुप्तपणे ठेवले गेले. जर मोठा सोहळा केला असता तर कदाचित कंसाला समजले असते आणि इतिहास वेगळा झाला असता.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Who exactly named shri krishna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • Religion
  • religion news
  • Shri Krishna

संबंधित बातम्या

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
1

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची
2

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत
3

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण
4

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.