Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Vastu Tips For Roti: भारतीय परंपरेत स्वयंपाकघराला घरातील सुख-समृद्धीशी जोडले जाते. अन्नाचा आदर करणे आणि स्वयंपाकघरातील वस्तूंची योग्य प्रकारे काळजी घेणे याला जुन्या काळापासून महत्त्व दिले जाते. याच पार्श्वभूमीवर रात्री जेवणानंतर पोळीचा डबा किंवा कॅसरोल पूर्णपणे रिकामा ठेवण्याबाबत वास्तुशास्त्रात एक पारंपरिक मान्यता सांगितली जाते

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 01:25 PM
Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाकघराला सुख-समृद्धीचे स्थान मानण्याची पारंपरिक धारणा
  • रात्री रिकामा रोटीचा कॅसरोल ठेवण्याबाबत वास्तुमान्यता
  • या समजुतींना वैज्ञानिक आधार नसून त्या परंपरेवर आधारित आहेत
आपल्या घरात स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवायची जागा नाही. आपल्या आजीच्या काळापासून सांगितलं जातं की स्वयंपाकघर म्हणजे घराचं सुखशांती वसा असलेली जागा असते. जिथे अन्न नाहीतर आपण लहानाचे मोठे होतो. म्हणूनच स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे. आपण अन्न जसं खाते यावरुनच घरात पैसा टिकतो. असं वरिष्ठ लोक सांगतात.

बऱ्याच घरांमध्ये एक सवय असते. रात्री जेवण झालं की पोळ्यांचा डबा म्हणजे टोपल तसेच रिकामे ठेवले जाते. परंतू त्यामध्ये एखादी शिळी पोळी असेल तर तशीच रात्रभर ठेवली जाते. सकाळी बघू म्हणून सोडून देतात. पण तुम्हाला माहिती आहे की, रात्री चपाती किंवा भाकरीचे टोपलं पूर्णपणे रिकामा ठेवणं हे वास्तुशास्त्रानुसार चांगलं नसते. Vastu Tips For Roti:

रिकामा डबा का ठेवू नये?

वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की कोणतंही अन्नाचं भांडं कधीच पूर्णपणे रिकामं ठेवू नये. रिकामं भांडं हे घरात कमतरता आहे असं दाखवतं. म्हणजे घरात अन्न नाही, पैसा नाही अशी भावना तयार होते. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर जरी चपात्या किंवा भाकरी संपल्या असल्या तरी डबा तसाच उघडा आणि रिकामा टाकू नका.

त्यात निदान एक तरी चपाती किंवा भाकरी ठेवा किंवा तो डबा स्वच्छ धुवून कोरडा करून बंद करून ठेवा. पण घाणेरडा आणि उघडा कधीच ठेवू नका.असं पण म्हणतात की रिकामी भांडी घरात गरिबी आणतात. जिथे अन्न भरलेलं असतं तिथे नेहमी लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच पूर्वीच्या बायका धान्याचे डबे कधीच रिकामे होऊ देत नव्हत्या.मग रात्री काय करावं?

योग्य नियम काय आहेत?

१. जर तुम्हाला शिळी चपाती किंवा भाकरी ठेवायची नसेल तर डबा तसाच ठेवू नका. तो पूर्णपणे घासून घ्या. पाण्याने स्वच्छ धुवा, कोरडा करा आणि झाकण लावून बंद करून ठेवा. अस्वच्छ डबा रात्रभर तसाच ठेवणं हे सगळ्यात वाईट

२. काही लोक एक छोटा उपाय करतात. जर डबा स्वच्छ आणि कोरडा असेल तर त्यात मूठभर तांदळाचे दाणे किंवा पावाचा एक छोटा तुकडा टाकून झाकण बंद करतात. याचा अर्थ असा की भांडं कधीच रिकामं नाहीये. ही एक जुनी पद्धत आहे बरकत टिकवण्यासाठी. तुम्ही पण असं करू शकता.

३. अन्नाचं भांडं कुठे ठेवावं याला पण महत्त्व आहे. शिजवलेलं अन्न किंवा चपाती किंवा भाकरीचा डबा नेहमी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे जिथे गॅस असतो तिथे किंवा पूर्व दिशेला ठेवणं चांगलं असतं.

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत

४. आणखी एक गोष्ट, रात्री उरलेलं अन्न फेकून देऊ नका. जर पोळी उरली असेल तर सकाळी त्याचा चुरा करून पक्षांना द्या किंवा गाईला द्या. अन्न फेकणं हे पाप मानलं जातं.खरं तर या सगळ्या गोष्टी वास्तूपेक्षा जास्त स्वच्छतेच्या आणि समजुतीच्या आहेत. स्वयंपाकघर स्वच्छ असेल, अन्नाचा आदर केला तर घरात आपोआपच सकारात्मक वाटतं.

रात्री झोपण्याआधी पाच मिनिटं काढून ओटा आवरला, डबे स्वच्छ ठेवले की सकाळी उठल्यावर पण छान वाटतं.म्हणून आजपासूनच ही सवय लावून घ्या. रात्री पोळीचा डबा कधीच घाणेरडा आणि रिकामा उघडा ठेवू नका. एकतर त्यात थोडी पोळी ठेवा किंवा स्वच्छ धुवून बंद करून ठेवा. छोटीशी सवय आहे पण घरात सुख आणि समृद्धी टिकवून ठेवायला मदत करते.

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips for roti is keeping an empty roti container at night auspicious know the belief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • dharm
  • Marathi News
  • navrashtra news
  • Religion
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत
1

Money Vastu Tips: पगार भरघोस, पण सेव्हिंग शून्य? घरातील ‘या’ 5 गोष्टी ठरू शकतात कारणीभूत

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण
2

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
3

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
4

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.