फोटो सौजन्य- pinterest
कर्नाटकातील बिदार खंडोबा मंदिर येथे खंडोबाची मल्लारी स्वरूपात पूजा केली जाते. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले असून, येथे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. या परंपरेमागे पौराणिक कथा आणि स्थानिक श्रद्धा जोडलेल्या आहेत, ज्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरते.
महाराष्ट्रातील जेजुरी गड हा खंडोबाचा मुख्य मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का खंडोबाची पूजा केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही केली जाते. कर्नाटकातील बिदार येथे असलेले मल्लारी याची माहिती जाणून घेऊया
महाराष्ट्रात ज्याला खंडोबा म्हणतात त्यालाच कर्नाटकात मल्हारी किंवा मल्लारी म्हणून ओळखलं जातं. मणी आणि मल्लाच्या वधाची कथा आपण पाहिलेली आहे. घोड्यावरती स्वार होऊन शिवाने हे युद्ध केलं आणि मल्लाचा वध केला आणि मणीने शरणागती पतकरून खंडोबाच्या पूजेत मान मिळविला. म्हणूनच या देवाचे नाव मल्लारी म्हणजेच मल्लाचा अळी अर्थात मल्लाचा शत्रू यावरून पडलं आहे.
कर्नाटकातील हे मंदिर खूप जुनं असून स्थानिक लोकांमध्ये अत्यंत श्रद्धेचं आहे. येथे मल्लारीची मूर्ती घोड्यावर बसलेली दाखवली जाते. जी युद्ध देवतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राप्रमाणेच येथेही भंडारा अर्पण केला जातो. जे विजय आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. भक्त मोठ्या श्रद्धेने देवाला भंडारा अर्पण करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. असं असलं तरी काही बाबतीत या दोन्ही ठिकाणी थोडंस वेगळेपणा आढळून येतो.
जेजुरी मणी मल्ल राक्षसाचा वध खंडोबाचा विवाह म्हणजे म्हाळसा आणि बाणाई यावरती जास्त लक्ष देणारं आहे तर बिदार या देवस्थानाचा अधिक भर मल्लारी अवतारावर आहे. विशेषतः मल्ल राक्षसाच्या वधाची कथा केंद्रस्थानी मानली जाते. शिवाय दोन्हीकडे भंडारा असतो पण जेजुरी इतका भव्य नाही. शिवाय येथे कर्नाटक शैलीतील पूजा आणि विधी केला जातो. येथे मल्लारी हा संकटांपासून रक्षण करणारा देव शेतकरी आणि धनगर समाजाचा कुलदैवत असून नवस पूर्ण करणारा असं हे स्थान आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मल्ल राक्षसाचा वध केल्यामुळे खंडोबाला “मल्लारी” (मल्लाचा शत्रू) असे नाव मिळाले.
Ans: बिदार खंडोबा मंदिर हे कर्नाटकातील बिदार येथे स्थित आहे.
Ans: परंपरा सारखी असली तरी स्थानिक रितीरिवाज आणि पूजा पद्धतींमध्ये थोडा फरक आढळतो.






