मुंबई : वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर आणि स्लीप, वेलनेस सोल्युशन्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनातील अग्रगण्य ‘लिव्हप्युअर’ (Livpure)ने नुकतीच नवीन उत्पादन श्रेणी लाँच (Products launch) केली आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी या ब्रँडने एसीपासून वॉटर प्युरिफायर्सपर्यंत (AC t0 Water Purifiers) अनेक स्मार्ट घरगुती उपकरणे (Smart Home Appliances) बाजारात दाखल केली आहेत.
लिव्हप्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रितेश तलवार म्हणाले, “लिव्हप्युअरमध्येआम्ही हे जाणतो की, आमचे ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त वेळ घरी घालवत आहेत. त्यांच्या दैनंदिन वाढत्या गरजा लक्षात घेत, आम्ही सुपर-स्मार्ट तंत्रज्ञानाधारित घरगुती उपकरणांची विस्तृत श्रेणी लाँच केली आहे. हे तंत्रज्ञान दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सहजसोप्या करेल. घरामध्येच आरामदायी दिवस घालवता येईल सोबत पिण्याचे गरम पाणी ही मिळेल. आम्हाला विश्वास आहे की, ही उत्पादने आमच्या ग्राहकांच्या जीवनशैलीत भर घालतील, आणि प्रत्येक दिवस अधिक सुविधाजनक देखील करतील.”
[read_also content=”पैसे वाचविणारी ऑफर! 108MP कॅमेरा असलेला Redmi Note 10 Pro Max स्वस्तात होईल तुमचा https://www.navarashtra.com/latest-news/discount-on-redmi-note-10-pro-max-this-redmi-smartphone-under-20000-available-with-offers-know-the-details-here-nrvb-185951.html”]
हेका या स्मार्ट परिणामकारक तंत्रज्ञानासह लिव्हप्युअरने ५ स्टार रेटिंगचा एसी तयार केला आहे, जो तुमच्या गरजेनुसार तीन मोडमध्ये थंडपणाची अनुभूती देईल. हेका मोड ऊर्जेच्या योग्य वापरासह आराम देईल. मॅजिक मोड समाधान मिळवून देईल तर ग्रीन मोड ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करेल. या अद्ययावत वैशिष्ट्यांसह आपण आपल्या बिलावर ४०% पर्यंत वीज बचत करू शकता. ॲमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमच्या माध्यमातून युझर्सना त्यांच्या एसीवर सहजपणे नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे बिघाड झाल्यास हे स्वतःच निदान करुन त्याची युझर्सना सूचना ही देते. जिओफेन्सिंगच्या मदतीने हा एसी तुमच्या फोनच्या लोकेशन अनुसार चालू किंवा बंदही होईल. याची किंमत – ३९,५९९ रु. आहे.
[read_also content=”‘या’ युजर्सचे स्मार्टफोन आजपासून होतील Outdated, गुगल-जीमेल-युट्यूब काहीही चालणार नाही https://www.navarashtra.com/latest-news/google-will-shut-gmail-youtube-and-google-service-in-android-2-3-version-smartphones-outdated-today-know-what-users-have-to-do-now-nrvb-185902.html”]
हेका स्मार्ट तंत्राज्ञानाआधारित ३ स्टार १.६ टी स्मार्ट इन्व्हर्टर एसी आजूबाजूच्या तापमानानुसार अनेक कस्टमाइझ्ड मोड्समध्ये स्वतः परिवर्तीत होतो. खोलीतील तापमानासोबत अनुकूल होत, हा एसी ४०% पर्यंत ऊर्जा बचत करतो. त्याचे ईजीएपीए फिल्टर चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध हवा प्रदान करते आणि एको-फ्रेंडली रिफ्रिजरेन्ट ओझोन थर कमी करते, पर्यावरणाचे संरक्षण करते. याचे आणखी एक विलक्षण वैशिष्ट्ये म्हणजे आपण एसीजवळ जाताच तो आपोआप कार्यान्वीत होतो. आवाज नियंत्रण प्रणालीद्वारे हा एसी स्वयंचलित होतो. याची किंमत ३५,९९९ रु. आहे.
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की चांगले पचन होण्यासाठी, सजलीकरण (हायड्रेशन), रक्ताभिसरण आणि मध्यवर्ती मज्जासंस्था कार्यरत ठेवण्यासाठी. तांब्याच्या अंगभूत गुणांसह लिव्हप्युअरच्या खास कॉपर कार्ट्रिज आणि ६ टप्प्यांच्या फिल्टरेशनसह हे सर्व फायदे मिळतात. झिंगर कॉपर हॉटसह, आपल्याला आरओ+युएफ+युव्ही शुद्धीकरण मिळते, तर यातील टँकचे युव्हीमुळे निर्जंतुकीकरण होते आणि जवळपास २०,००० लिटर पाण्याची बचत होते. याची किंमत २१,७७० रु. आहे.