वडोदरा येथे मुंबईकडून RCB चा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
MI vs RCB, WPL 2026 : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला गेला. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने १५ धावांनी विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स ने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला ९ गडी गमावून १८४ धावाच करता आल्या. परिणामी संघाला १५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत नॅट सायव्हर-ब्रंटच्या ऐसतिहासिक शतकाच्या जोरावर ४ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि आरसीबीसमोर २०० धावांचे लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आरसीबीच्या ५ षटकात ३५ धावांवर ५ गडी गमावल्या होत्या. ग्रेस हॅरिस १५ , कर्णधार स्मृती मानधना ६ , जॉर्जिया वॉल ९ , गौतमी नाईक १, राधा यादव ० धावा करून बाद झाले. त्यानंतर नदिन डी क्लर्क आणि रिचा घोष यांनी डाव सांभाळला. परंतु, नदिन डी क्लर्क २० चेंडूत २८ धावा करून बाद झाली. त्यानंतर रुंधती रेड्डी १४ धावा काढून बाद झाली. तर सायली सातघरे भोपळा न फोडता धावबाद झाली. दरम्यान रिचा घोषने झुंज देत ५० चेंडूत ९० धावांची खेळी केली, पण ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. श्रेयंका पाटील १२ धावांवर नाबाद राहिली. आरसीबीकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शबनीम इस्माईल आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी २ विकेट्स गहटल्या तर अमनजोत कौरने १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): सजीवन सजना, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), अमेलिया केर, राहिला फिरदौस (डब्ल्यू), अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, वैष्णवी शर्मा, शबनीम इस्माईल, पूनम खेमनार
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नदिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल






