Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष

पावसाच्या थेंबांचे बाष्पीभवन केवळ पर्जन्यमान कमी करत नाही, तर वातावरणातील उष्णतेचे संतुलन आणि ढगनिर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम करते. थेंबांचे बाष्पीभवन झाल्यामुळे वातावरणाचा खालचा थर थंड होतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 02:35 AM
आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच...; ' IITM 'च्या संशोधनातून निष्कर्ष

आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच...; ' IITM 'च्या संशोधनातून निष्कर्ष

Follow Us
Follow Us:

सरासरी २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत होत असल्याचा निष्कर्ष
प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी
मान्सूनच्या अंदाजाच्या अचूकतेवरही त्याचा परिणाम

सुनयना सोनवणे /पुणे: आकाशातून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीपर्यंत पोहोचतोच असे नाही, हे ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (आयआयटीएम), पुणेच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः पुणे परिसरात, ढगातून जमिनीकडे येताना पावसाच्या थेंबांपैकी सरासरी २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत होत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संशोधकांनी नोंदविला आहे. या प्रक्रियेमुळे (Enviornment) प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत असून, मान्सूनच्या अंदाजाच्या अचूकतेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

‘आयआयटीएम’च्या हवामान बदल संशोधन केंद्रातील संशोधकांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि तैवानमधील ॲकॅडेमिया सिनिका यांच्या सहकार्याने हा अभ्यास केला आहे. हा संशोधन निबंध नुकताच ‘ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासासाठी २०१९ च्या मान्सून हंगामात पुण्यातील पावसाच्या पाण्याचे आणि वातावरणातील बाष्पाचे नमुने एकाच वेळी संकलित करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले.

झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?

या संशोधनात पावसाच्या पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनच्या स्थिर समस्थानिकांचा (स्टेबल आयसोटोप्स) अभ्यास करण्यात आला. पावसाचे थेंब ढगातून जमिनीवर येताना त्यांचे किती बाष्पीभवन होते, हे मोजण्यासाठी ‘बिलो क्लाउड इंटरॲक्शन मॉडेल’ (बीसीआयएम) या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आला. तापमान, आर्द्रता आणि वातावरणातील बाष्प यांमुळे थेंब जमिनीवर पडण्यापूर्वीच काही प्रमाणात विरून जात असल्याचे यातून स्पष्ट झाले. हे बाष्पीभवन वातावरणानुसार चार ते ६१ टक्क्यांपर्यंत बदलत असून, संपूर्ण मान्सून हंगामात त्याचे सरासरी प्रमाण २३ टक्के आहे. विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या काळात ही प्रक्रिया अधिक प्रभावी ठरत असल्याने प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते.

मान्सूनच्या स्वरूपावरही परिणाम –
पावसाच्या थेंबांचे बाष्पीभवन केवळ पर्जन्यमान कमी करत नाही, तर वातावरणातील उष्णतेचे संतुलन आणि ढगनिर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम करते. थेंबांचे बाष्पीभवन झाल्यामुळे वातावरणाचा खालचा थर थंड होतो, हवेचे प्रवाह बदलतात आणि मान्सूनमधील संवहन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उष्णकटिबंधीय भागातील पावसाचे स्वरूप बदलण्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

अधिक अचूक हवामान अंदाजाला मदत –
सध्या मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हवामान मॉडेलमध्ये पावसाच्या थेंबांच्या बाष्पीभवनाचा पुरेसा विचार केला जात नाही. त्यामुळे या प्रक्रियेचे अचूक मापन भविष्यातील हवामान मॉडेल अधिक विश्वासार्ह आणि अचूक बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे मान्सूनचा अंदाज, जलसंपदा व्यवस्थापन, शेती नियोजन आणि हवामान बदलाच्या अभ्यासालाही मोठी मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष –
– ढगातून जमिनीकडे येताना पावसाच्या थेंबांचे सरासरी २३ टक्के बाष्पीभवन होते.
– वातावरणातील स्थितीनुसार हे प्रमाण ४ ते ६१ टक्क्यांपर्यंत बदलू शकते.
– कमी पर्जन्यमानाच्या काळात थेंबांचे बाष्पीभवन अधिक होते.
– पावसाचे प्रमाण, मान्सूनची संवहन प्रक्रिया आणि हवामानाच्या अंदाजावर या प्रक्रियेचा थेट परिणाम होतो.
– भविष्यातील हवामान मॉडेल अधिक अचूक करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: 23 of raindrops evaporate in air before reaching the ground iitm research concludes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • Monsoon
  • rain news marathi

संबंधित बातम्या

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
1

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.