Dinvishesh : शार्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज १९ जून, शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोविंद सिंग साहब जी यांची जयंती आहे. त्यांनी अध्यात्मिकतेसोबत शौर्य आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. गुरु अर्जन देव यांच्या हौतात्म्यानंतर शीख समाजाला संघिटत करुन अन्यायविरोधात लढा दिला. मीरी आमि पीरी या संकल्पनेद्वारे त्यांनी सांसारिक सत्ता आणि अध्यात्माक शक्तीचा समतोल मांडला. अमृतसर येथे सर्वोच्च राजकीय आणि धार्मिक संस्था अकाल तख्तची त्यांनी स्थापना केली. मुघल अत्याचारांपासून रक्षणासाठी शिखांचे सैन्य दल तयार केले आणि गतिका या युद्धकलेची सुरुवात केली. त्यांच्या कार्याचा शीख इतिहासावर दुरगामी प्रभाव आहे.
19 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1676 : शिवाजी महाराजांनी पश्चात्तापी सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध केले आणि त्यांना हिंदू धर्मात पुनर्स्थापित केले.
1862 : अमेरिकेने गुलामगिरीवर बंदी घातली.
1865 : गॅल्व्हेस्टन, यूएसए येथे गुलामांची मुक्तता. हा दिवस यापुढे जूनीटींथ म्हणून साजरा केला जातो.
1912 : अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस सुरू करण्यात आला.
1949 : शार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
1961 : कुवेतला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
1966 : शिवसेना राजकीय पक्षाची स्थापना.
1977 : ट्रान्स-अलास्कन पाइपलाइनने आर्क्टिक प्रदेशातून तेलाची वाहतूक सुरू केली.
1978 : गारफिल्ड या कार्टून पात्राने वृत्तपत्रात पदार्पण केले.
1981 : भारताच्या ‘ऍपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
1989 : ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे 19 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
1999 : कोलकाता ते ढाका मैत्रेयी एक्सप्रेस बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास
19 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1595 : ‘गुरु हर गोविंद’ – सहावे सिख गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 3 मार्च 1644)
1623 : ‘ब्लेस पास्कल’ – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1662)
1764 : ‘जोसेगेर्व्हासियो आर्तिगास’ – उरुग्वेचे राष्ट्रपिता यांचा जन्म.
1877 : ‘पांडुरंग चिमणाजी पाटील’ – पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य यांचा जन्म.
1941 : ‘वाक्लाव क्लाउस’ – चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1945 : ‘ऑँगसान सू की’ – म्यानमारची राजकारणी यांचा जन्म.
1947 : ‘सलमान रश्दी’ – ब्रिटिश लेखक यांचा जन्म.
1962 : ‘आशिष विद्यार्थी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1970 : ‘राहुल गांधी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1976 : ‘डेनिस क्रॉवले’ – फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक यांचा जन्म.
1985 : ‘काजल अगरवाल’ – भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.
19 जून रोजी मृत्यू दिनविशेष
1747 : ‘नादिर शहा’ – पर्शियाचा सम्राट यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1698)
1932 : ‘रेव्ह. जस्टिन एडवर्ड’ – मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक यांचे निधन.
1949 : ‘सैयद जफरुल हसन’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1885)
1956 : ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 17 फेब्रुवारी 1874)
1993 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 19 सप्टेंबर 1911)
1996 : ‘कमलाबाई पाध्ये’ – समाजसेविका यांचे निधन.
1998 : ‘रमेशमंत्री’ – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
2000 : ‘माणिक मुदलियार’ तथा ‘माणिक कदम’ – मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
2008 : ‘बरुण सेनगुप्ता’ – बंगाली पत्रकार यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1934)
Dinvishesh : स्वराज्याचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ जूनचा इतिहास






