Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर्पणकार जांभेकर यांच्या जन्मदिनी मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला झाली सुरुवात; जाणून घ्या 06 जानेवारीचा इतिहास

मराठी पत्रकारितेचा मुहूर्तवेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये झाला. त्यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरु केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 06, 2026 | 10:56 AM
Balshastri Jambhekar Birth anniversary first Marathi newspaper Darpan patrakar Din

Balshastri Jambhekar Birth anniversary first Marathi newspaper Darpan patrakar Din

Follow Us
Close
Follow Us:

समाजातील व्यथा मांडण्यासाठी आणि समाजाचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वर्तमानपत्रांचा मोठा वाटा आहे. मराठी वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला होता, ज्यामुळे इतिहासात मराठी पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले. आजही मराठी पत्रकारिता आपली वेगळी ओळख धरुन आहे.

06 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1673 : कोंडाजी फर्जदने केवळ 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.
  • 1832 : पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक ‘दर्पण’ सुरू केले.
  • 1838 : सॅम्युअल मोर्स यांनी टेलीग्राफचा शोध लावला.
  • 1907 : मारिया माँटेसरीने पहिली माँटेसरी शाळा सुरू केली. तिच्या शाळांनी पूर्व प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणला.
  • 1912 : न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47 वे राज्य बनले.
  • 1924 : स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकारणात भाग घेणार नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यात राहतील या अटीवर जन्मठेपेतून मुक्त करण्यात आले.
  • 1929 : गरीब आणि आजारी लोकांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा कोलकाता येथे आल्या.
हे देखील वाचा : वेळचे आणि वयाचे गणित अगदी चालते बरोबर; राजकीय नेते जुने झाल्यास अनुभव येतो खरोखर

06 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1745 : ‘जाक्कास एलियन माँटगोल्फिएर’ – बलूनच्या सहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणारे वैज्ञानिक यांचा जन्म.
  • 1812 : ‘बाळशास्त्री जांभेकर’ – मराठी पत्रकारितेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 1846)
  • 1822 : ‘हेन्रीचा श्लीमन’ – उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या यांचा जन्म.
  • 1868 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1962)
  • 1883 : ‘खलील जिब्रान’ – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 1931)
  • 1925 : ‘जॉन डेलोरेअन’ – डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2005)
  • 1927 : ‘रमेश मंत्री’ – वर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 1997)
  • 1928 : ‘विजय तेंडुलकर’ – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 2008 – पुणे, महाराष्ट्र)
  • 1931 : ‘डॉ. आर. डी. देशपांडे’ – पर्यावरण शास्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1955 : ‘रोवान अ‍ॅटकिन्सन’ – विनोदी अभिनेते व पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1959 : ‘कपिलदेव’ – भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री यांचा जन्म.
  • 1966 : ‘ए. आर. रहमान’ – सुप्रसिद्ध संगीतकार यांचा जन्म.
  • 1984 : ‘दिलजीत दोसांझ’ – भारतीय गायक, गीतकार, अभिनेता यांचा जन्म.
हे देखील वाचा : जाणून घ्या ‘दर्पण’ ला सुरुवात करुन मराठी पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या महापुरुषाबद्दल

06 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1796 : ‘जिवबा दादा बक्षी’ – महादजी शिंदे यांचे सेनापती यांचे निधन.
  • 1847 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचे निधन. (जन्म : 4 मे 1767)
  • 1852 : ‘लुई ब्रेल’ – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1809)
  • 1884 : ‘ग्रेगोर मेंडेल’ – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 जुलै 1822)
  • 1885 : ‘भारतेंदू हरीश्चंद’ – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1850)
  • 1918 : ‘जी. कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1845)
  • 1919 : ‘थिओडोर रूझवेल्ट’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1858)
  • 1939 : ‘गुस्ताव झेमगल्स’ – लॅटव्हिय देशाचे 2रे अध्यक्ष, राजकारणी यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1871)
  • 1947 : ‘मारिया शिकलग्रुबर’ – अॅलोइस हिटलरच्या आई आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आजी यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1795)
  • 1968 : ‘कार्ल कोबेल्ट’ – स्विस कॉन्फेडरेशनचे 52वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1891)
  • 1971 : ‘पी. सी. सरकार’ – जादूगार यांचे निधन. (जन्म : 23 फेब्रुवारी 1913)
  • 1981 : ‘ए. जे. क्रोनिन’ – स्कॉटिश लेखक यांचे निधन. (जन्म : 19 जुलै 1896)

Web Title: Balshastri jambhekar birth anniversary first marathi newspaper darpan patrakar din

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
1

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
2

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास
3

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०६ मे रोजीचा इतिहास
4

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०६ मे रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.