Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम भव्य लाल किल्ल्याचे उभारणी; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास

Red Fort Delhi : लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 10:39 AM
Delhi Red Fort, built by Shah Jahan witness to the history of the Mughal Empire 13 april history

Delhi Red Fort, built by Shah Jahan witness to the history of the Mughal Empire 13 april history

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील लाल किल्ला हा भारताच्या समृद्ध इतिहासाचा एक साक्षीदार मानला जातो. लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. सुमारे 10 वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या या भव्य किल्ल्याचे काम इ.स. 1648 मध्ये पूर्ण झाले. लाल वाळूच्या दगडांपासून तयार झाल्यामुळे याला ‘लाल किल्ला’ हे नाव देण्यात आले.

मुघल साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यात दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, रंग महल यांसारख्या आकर्षक वास्तूंचा समावेश आहे. 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम दरम्यान या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पुढे भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते येथे ध्वजारोहण केले जाते. इतिहास, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम असलेला लाल किल्ला आजही पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतो. (Dinvishesh)

 

13 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1648 : दिल्ली येथील लाल किल्ला बांधण्यात आला.
  • 1731 : छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यातील राज्याच्या सीमेचा वाद वारणा तहाने मिटला.
  • 1849 : हंगेरी देश प्रजासत्ताक बनले.
  • 1919 : जालियनवाला बाग हत्याकांड, 379 लोक ठार आणि 1,200 जखमी.
  • 1942 : व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली.
  • 1948 : भुवनेश्वरला ओरिसा राज्याची राजधानी बनवण्यात आली.
  • 1960 : अमेरिकेने ट्रान्झिट 1-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला.
  • 1997 : टायगर वुड्स मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण गोल्फर ठरला.
  • 2000 : प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.
हे देखील वाचा : शहीद विहीर आजही देतेय साक्ष! जालियनवाला बाग हत्याकांडाला 107 वर्षे; असा बदलला भारताचा इतिहास

13 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1743 : ‘थॉमस जेफरसन’ – अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1826)
  • 1895 : ‘वसंत रामजी खानोलकर’ – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1978)
  • 1905 : ‘ब्रूनो रॉस्सी’ – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 1993 〉
  • 1906 : ‘सॅम्युअल बेकेट’ – आयरिश लेखक, नाटककार आणि कवी यांचा जन्म.
  • 1922 : टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1999)
  • 1940 : ‘नजमा हेपतुल्ला’ – राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
  • 1956 : ‘सतीश कौशिक’ – अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
    1963 : ‘गॅरी कास्पारॉव्ह’ – रशियन बुद्धिबळपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा : होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम

13 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1951 : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1868)
  • 1973 : ‘बलराज सहानी’ – अभिनेता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 1 मे 1913)
  • 1973 : ‘अनंत काकबा प्रियोळकर’ – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1895)
  • 1988 : ‘हिरामण बनकर’ – महाराष्ट्र केसरी यांचे निधन.
  • 1999 : ‘डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले’ – कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
  • 2000 : ‘बाळासाहेब सरपोतदार’ – चित्रपट निर्माते व वितरक यांचे निधन.
  • 2008 : ‘दशरथ पुजारी’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1930)

Web Title: Delhi red fort built by shah jahan witness to the history of the mughal empire 13 april history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

गुंतवणूकदारांचा विश्वास जपणाऱ्या SEBI ची स्थापना; जाणून घ्या 12 एप्रिलचा इतिहास
1

गुंतवणूकदारांचा विश्वास जपणाऱ्या SEBI ची स्थापना; जाणून घ्या 12 एप्रिलचा इतिहास

विद्येविना मती गेली…! शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महामानव महात्मा फुले यांची जयंती; जाणून घ्या ११ एप्रिलचा इतिहास
2

विद्येविना मती गेली…! शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महामानव महात्मा फुले यांची जयंती; जाणून घ्या ११ एप्रिलचा इतिहास

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास
3

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास
4

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.