
first Chief Minister of Maharashtra Yashwantrao Chavan Birth anniversary 12 march
Yashwantrao Chavan birth anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृतपणाची बीजे रोवणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जातात. १२ मार्च १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी शिक्षण, सामाजिक जाणीव आणि राजकीय नेतृत्वाच्या बळावर मोठे स्थान मिळवले. ज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सहकार चळवळ, औद्योगिक विकास, शेती आणि शिक्षण या क्षेत्रांना त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला भक्कम दिशा मिळाली. पुढे ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत होते. त्यांच्या शांत, संयमी आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे आजही त्यांच्या स्मृती जनमानसामध्ये जीवंत आहेत. (Dinvishesh)
12 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 मार्च रोजी जन्म दिनविशेष
12 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष