भारतातील आणीबाणीचा इतिहास
काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आणि त्यानंतर भारताची लोकशाही पूर्णपणे बदलून गेली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर देशभरात सगळीकडे आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारतामध्ये जन्म घेतलेल्या तरुणांनी सगळ्यात आधी ब्रिटिश राजवट पहिली. त्यानंतर 25 जून 1975 पूर्वी भारतामध्ये दोनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारतामध्ये 1962 आणि 1971 नंतर 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली होती.त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. पण तिसऱ्यांदा लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या वेळी युद्ध झाले नव्हते. तर त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजकीय कारणामुळे देशात आणीबाणी लावली.(फोटो सौजन्य-twitter/Research Gate )
राज्यघटनेच्या कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, देशाच्या राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यावेळी युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंड होतात, ज्या काळात आणीबाणी जाहीर केली जाते. तसेच युद्धामुळे देशाला धोका निर्माण झाल्यास आणीबाणी जाहीर केली जाते.आणीबाणी लागू करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती आणि अधिकाऱ्याला नाही. या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार तात्पुरते स्थगित केले जातात.
भारतातील आणीबाणीचा इतिहास
देशामध्ये तीनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. देशभरात ही आणीबाणी 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968 पर्यंत लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1971 मध्ये भारत- पाकिस्तनमध्ये युद्ध चालू असताना आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 3 डिसेंबर 1971 दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या कार्यकाळात तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली. 25 जून 1975 ला तिसरी आणीबाणी लावण्यात आली. त्यावेळी आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी आकाशवाणीवरून देशवासियांना आणीबाणीची माहिती दिली. त्यांनी घेतलेला हा निर्णय ऐकून जनतेला आश्चर्य वाटले. त्यानंतर २१ मार्च १९७७ रोजी तिसरी आणीबाणी संपवण्यात आली. आणीबाणीच्या काळात देशामध्ये सगळीकडे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी अनेक राजकीय अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.