जागतिक आनंद दिन का साजरा केला जातो? फिनलंड पुन्हा अव्वल, तर भारताची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World Happiness Report 2026 India Rank : आज २० मार्च, म्हणजेच ‘जागतिक आनंद दिन’ (International Day of Happiness). धकाधकीच्या आयुष्यात, स्पर्धेच्या युगात आणि महागाईच्या काळात आपण हसणं विसरलो आहोत का? हाच प्रश्न विचारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०१२ मध्ये या दिवसाची सुरुवात केली. आनंद हा केवळ मनात असणारा भाव नाही, तर तो प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. यंदाचा हा दिवस भारतासाठी खास आहे, कारण नुकत्याच जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२६’ मध्ये भारताच्या क्रमवारीत किंचित सुधारणा झाली आहे.
ताज्या अहवालानुसार, भारताने ११६ वे स्थान पटकावले आहे. २०२४ मध्ये आपण १२६ व्या स्थानावर होतो, तर २०२५ मध्ये ११८ व्या स्थानावर. जरी ही सुधारणा स्वागतार्ह असली, तरी आपण पाकिस्तान (१०४ वा) आणि नेपाळ (९९ वा) यांसारख्या शेजारील देशांच्या तुलनेत अजूनही मागे आहोत. अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील भ्रष्टाचाराचे कमी होत असलेले प्रमाण आणि लोकांमध्ये वाढलेली दानशूरता (Generosity) यामुळे आपली रँकिंग सुधारली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध सुरु होणार? इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक अहवाल आला समोर
२०२६ च्या जागतिक आनंद दिनाची थीम ‘Happiness and Social Media’ अशी आहे. आज आपण तासनतास मोबाईलवर ‘स्क्रोल’ करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? तासाभरापेक्षा जास्त काळ सोशल मीडियावर घालवणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. जे लोक दिवसातून १ तासापेक्षा कमी वेळ सोशल मीडिया वापरतात, ते अधिक आनंदी असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरील ‘दिखाऊ’ आयुष्य आणि आपली तुलना इतरांशी करणे, हे आजच्या दुःखाचे मुख्य कारण ठरत आहे.
On the International Day of Happiness, Happiness blooms where gratitude flows and expectations dissolve.#SadguruWhispers #Quotes #QOTD #Happiness #Gratitude #Thankful pic.twitter.com/X8shETT3RD — Shrimad Rajchandra Mission Dharampur (@SRMDharampur) March 20, 2026
credit – social media and Twitter
फिनलंड सलग नऊ वर्षांपासून जगातील सर्वात आनंदी देश आहे. तिथल्या लोकांच्या आनंदाचे रहस्य पैशात नसून तिथल्या ‘Infrastructural Happiness’ मध्ये आहे. याचा अर्थ, तिथल्या सरकारी यंत्रणेवर लोकांचा असलेला विश्वास, मोफत आरोग्य सुविधा, उच्च दर्जाचे शिक्षण आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती. फिनलंडमधील लोक निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवतात आणि त्यांच्याकडे ‘साऊना’ सारखी मानसिक ताण कमी करण्याची संस्कृती आहे.
केवळ एक दिवस साजरा करून आनंद मिळणार नाही. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे:
१. कृतज्ञता व्यक्त करा: दिवसाच्या शेवटी अशा ३ गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात.
२. मदत करा: इतरांना छोटीशी मदत केल्याने आपल्या मेंदूत ‘डोपामाइन’ नावाचे आनंदी संप्रेरक स्रवते.
३. निसर्गाच्या सानिध्यात राहा: किमान २० मिनिटे मोकळ्या हवेत फिरल्याने मानसिक तणाव कमी होतो.
४. डिजिटल डिटॉक्स: रात्री झोपण्यापूर्वी किमान १ तास मोबाईल बाजूला ठेवा.
५. योगा आणि ध्यान: मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज १० मिनिटे ध्यान करा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ohio Meteor : अंतकाळाच्या सावटाखालील जग! NASA फेल, रडार शांत; कोणत्याही इशाऱ्याशिवाय पृथ्वीवर आदळला मोठा लघुग्रह
आनंद हा बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्या दृष्टिकोनात असतो. २०२६ चा हा जागतिक आनंद दिन आपल्याला हेच सांगतो की, तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित करा आणि खऱ्या आयुष्यातील लोकांशी नाती घट्ट करा. लक्षात ठेवा, आनंदी असणे हा केवळ तुमचा हक्क नाही, तर ती तुमची जबाबदारीही आहे!
Ans: हा दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो.
Ans: जागतिक आनंद अहवाल २०२६ नुसार भारत १४७ देशांमध्ये ११६ व्या क्रमांकावर आहे.
Ans: फिनलंड हा सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.






