IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? (photo Credit- X)
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून मुंबई इंडियन्समध्ये परत आणले गेले होते. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माला हटवून थेट हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापले होते आणि सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली होती. तेव्हापासून मुंबईच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
हार्दिक पंड्याच्या कप्तानीखाली मुंबई इंडियन्सचा आलेख चढ-उताराचा राहिला आहे:
श्रीकांत यांच्या मते, संघात जेव्हा दोन विश्वविजेते कर्णधार (रोहित आणि सूर्या) उपस्थित आहेत, तेव्हा हार्दिकने मोठे मन दाखवायला हवे. ते म्हणाले, “ही परिस्थिती थोडी विचित्र आहे. हार्दिकने स्वतः रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला आहे. अशा स्थितीत त्याने स्वतःहून पुढे येऊन सांगायला हवे की, आता सूर्यकुमारने संघाचे नेतृत्व करावे आणि मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन.”
नुकत्याच झालेल्या ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले. मैदानावरील त्याचे आक्रमक निर्णय, चपळ क्षेत्ररक्षण लावण्याची पद्धत आणि खेळाडूंना एकत्र घेऊन चालण्याची शैली यामुळे त्याच्या कप्तानीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच यशामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी सूर्याचे नाव आघाडीवर आहे.
या हंगामातही मुंबईकडे हार्दिक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या दिग्गजांची फौज आहे. तसेच संघाने क्विंटन डी कॉक, शार्दुल ठाकूर आणि रदरफोर्ड यांसारख्या खेळाडूंना जोडून संघ अधिक मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध करणार आहे. आयपीएलचे 12 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असून, संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष मुंबईच्या ‘कॅप्टन’ कोण असेल याकडे लागले आहे.






