शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच अंबाजोगाई शहरालगतच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. बालासाहेब चोपणे या शेतकऱ्याने आपल्या अवघ्या 04 गुंठे जमिनीत लावलेल्या पुदिना पिकातून गेल्या 05 वर्षांत 05 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून ‘बाप-लेक लखोपती’ होण्याचा मान मिळवला आहे. बालासाहेब चोपणे यांची एकूण 20 गुंठे जमीन असून त्यात त्यांनी पेरू, आंबा आणि विविध फुलांची झाडे लावली आहेत. मात्र,2020 मध्ये त्यांनी कोविड काळात 04 गुंठ्यांत पुदिन्याची लागवड केली. विशेष म्हणजे, या पिकासाठी ते कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करत नाहीत. पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने जोपासल्यामुळे या पुदिन्याला चव आणि सुगंध उत्तम मिळतो.