Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Plastic Bag Free Day : बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरुच; महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?

International Plastic Bag Free Day 2026 : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे समुद्र, नद्या, वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे प्लास्टिकच्या प्रदूषणाविरुद्ध जनजागृती वाढवण्यासाठी णि लोकांनी दैनंदिन जीवनात पुनर्वापरन करता येणाऱ्या पिशव्यांचा स्वीकार करावा हे पटवून देण्यासाठी प्लास्टिक बॅग मुक्त दिन पाळला जातो.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 09:22 AM
International Plastic Bag Free Day 2026

International Plastic Bag Free Day 2026

Follow Us
Follow Us:
  • बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरुच
  • महाराष्ट्रातील आकडेवारी काय सांगते?
  • पर्यावरणावर होतोय परिणाम
International Plastic Bag Free Day  2026 : सुनयना सोनवणे : दुकानातून घेतलेली एक छोटीशी प्लास्टिक पिशवी… काही मिनिटांत उपयोग संपतो आणि ती फेकून दिली जाते. पण हीच साधी वाटणारी पिशवी निसर्गात मात्र शेकडो वर्षे टिकून राहते आणि हळूहळू पर्यावरणात अदृश्य पण कायमस्वरूपी परिणाम सोडते. याच विरोधाभासाची जाणीव करून देण्यासाठी ३ जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

प्लास्टिकची सोय पण पर्यायवरणावर ओझे

कागद आणि कापडाला पर्याय म्हणून १९६० नंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. हलक्या, स्वस्त आणि सोयीस्कर वाटणाऱ्या या पिशव्यांनी बाजारपेठा व्यापल्या. मात्र त्याच वेगाने त्या पर्यावरणीय संकटाचे कारणही बनल्या. तज्ञांच्या मते, प्लास्टिक नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही; ते सूक्ष्म कणांमध्ये विभागले जाऊन पाणी, माती आणि अन्नसाखळीत प्रवेश करते.

बंदी असूनही वापर सुरुच

महाराष्ट्रात २०१८ पासून प्लास्टिक कॅरी बॅग्सवर बंदी लागू आहे. २०२२ मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर अधिक कठोर निर्बंध आले. तरीही प्रत्यक्ष बाजारात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबलेला नाही. नियम आणि जनजागृती असूनही सवयींचा बदल हळूहळूच होत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील कचरा व्यवस्थापनही या वास्तवाकडे निर्देश करते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी ४.२७ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी मोठा भाग पुनर्वापरात जात असला तरी सुमारे ६८,८७३ टन कचरा लँडफिलमध्ये जातो.

राज्यातील शहरांमध्ये व्यवस्थापन तुलनेने मजबूत असले तरी लहान शहरांमध्ये अंमलबजावणीचा वेग कमी आहे. पुणे शहरातच ८५,४६२ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी ७१,५६० टन कचरा पुनर्वापरात जातो.

कडक कारवाई

२०२३- २४ मध्ये राज्यभरात १,७८,७५० दुकाने तपासली गेली, त्यापैकी ८,३३१ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामधून सुमारे साडे चार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून १९१ मेट्रिक टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले

प्लास्टिक पिशवीला पर्याय काय?

  • कापडी पिशव्या – टिकाऊ व पुन्हा वापरता येणाऱ्या
  • ज्यूट पिशव्या – मजबूत व नैसर्गिक पर्याय
  • कागदी पिशव्या – हलक्या व सहज विघटित होणाऱ्या
  • कंपोस्टेबल बॅग्स – जैवविघटनशील
  • रीयूजेबल शॉपिंग बॅग्स – दीर्घकाळ वापरासाठी
  • घरगुती कापडी पिशव्या/टोपल्या – शून्य खर्चाचा पर्याय

प्लास्टिक बॅग मुक्तीसाठी काय करावे?

  • खरेदीला जाताना स्वतःची पिशवी सोबत ठेवावी
  • प्लास्टिक पिशवीला स्पष्ट नकार द्यावा
  • कचरा वर्गीकरण करून रिसायकलिंगला द्यावा
  • दुकानदारांना पर्यावरणपूरक पर्याय वापरण्यास प्रोत्साहन द्यावे
  • समाजात जनजागृती करावी
  • कापडी/ज्यूट पिशवी वापरण्याची सवय लावावी
  • स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा

महाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा (२०२३-२४)

एकूण चित्र –
  • प्लास्टिक कचरा निर्मिती – ४,२७,९२६ टन
  • गोळा केलेला कचरा – ३,६१,३३७ टन
  • पुनर्वापर – ३,२१,८४० टन
  • लँडफिल – ६८,८७३ टन
(स्त्रोत – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वार्षिक अहवाल २०२३-२४)

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा

Web Title: International plastic bag free day 2026 maharashtra plastic bag ban reality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • dinvishesh
  • plastic bag
  • pollution

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.