Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 02:35 AM
Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा
Follow Us
Follow Us:

हळूहळू दुर्मिळ होत चालली मुंग्यांची वारुळे
हवामानातील अस्थिरता यामुळे मुंग्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात
अभ्यासकांकडून व्यक्त केली जात चिंता

सुनयना सोनवणे / पुणे:  ग्रामीण भागातील मोकळ्या शेतात, बांधावर, रानावनात किंवा झाडाझुडपांच्या आसपास सहज दिसणारी मुंग्यांची वारुळे आता हळूहळू दुर्मिळ होत चालली आहेत. एकेकाळी पावसाळ्यापूर्वी (Navarashtra Special) जमिनीवर उठून दिसणारी ही मातीची ‘निसर्गरचना’ आता अनेक भागांत शोधूनही सापडत नाही. पर्यावरणातील वेगाने होणारे बदल, वाढते काँक्रीटीकरण, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि हवामानातील अस्थिरता यामुळे मुंग्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून परिसंस्थेतील हा सूक्ष्म पण महत्त्वाचा घटक लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

जगभरात मुंग्यांच्या १५ हजारांहून अधिक जाती आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे ५७ प्रकारच्या जाती आणि प्रजातींची नोंद आहे. मात्र या जीवसृष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणारी संस्था राज्यात नसल्याची खंत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करतात. मुंग्या या ‘इकोसिस्टम इंजिनियर्स’ म्हणून ओळखल्या जातात. त्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, माती भुसभुशीत ठेवतात आणि अनेक हानिकारक कीटकांचे नियंत्रणही करतात.

आपल्याला जमिनीवर दिसणारी मोठी वारुळे ही मुंग्यांची वाटत असली तरी बहुतांश वेळा ती वाळवीची असतात. जमिनीवरील संरचनेपेक्षा मुंग्यांचे खरे जग हे जमिनीखाली असते. असंख्य भुयारे, मार्ग, धान्यसाठे, विश्रांती कक्ष, अन्नसाठवण जागा आणि अगदी ‘डर्ट चेंबर’सारखी स्वच्छतेसाठीची स्वतंत्र व्यवस्था अशा अत्यंत शिस्तबद्ध रचनेत मुंग्यांची वसाहत उभी असते. काही जातींमध्ये मृत मुंग्यांसाठी स्वतंत्र ‘स्मशानभूमी’ही असते. ‘ओलिक ॲसिड’ या रसायनाच्या वासावरून मृत मुंगी ओळखून तिला वसाहतीबाहेर नेले जाते.

‘हॉटस्पॉट’! काँक्रीटच्या जंगलात हरवला ‘गारवा’; उष्णतेच्या लाटेत होरपळतेय ‘आपलं पुणे

काही मुंग्या झाडांवर घरटी विणतात, तर काही जमिनीखाली बुरशीची लागवड करून तिच्यावर जगतात. त्यामुळे त्यांच्या वसाहती एखाद्या सुबक शहरासारख्या मानल्या जातात. एका वारुळात लाखो ते कोट्यवधी मुंग्या राहू शकतात. विशेष म्हणजे वारुळ जमिनीवर जितके दिसते, त्यापेक्षा तिप्पट-चौपट भाग जमिनीखाली विस्तारलेला असतो. मात्र शेतीतील वाढता रासायनिक वापर, जमिनीची धूप, बांधकामांसाठी होणारी खोदाई, मोकळ्या जागांचे काँक्रीटीकरण आणि वृक्षतोड यामुळे मुंग्यांना योग्य अधिवास मिळेनासा झाला आहे. वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे त्यांचे जीवनचक्रही विस्कळीत होत असल्याचे शेतकरी सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, मुंग्यांची परिसंस्था आणि जैवविविधता टिकवण्यासाठी मोकळ्या जमिनी जपणे, स्थानिक वृक्षलागवड वाढवणे, रासायनिक औषधांचा मर्यादित वापर करणे आणि नैसर्गिक अधिवास संरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे. निसर्गातील शिस्त, परिश्रम आणि संघटनेचे प्रतीक मानली जाणारी ही वारुळे अदृश्य होत जाणे ही केवळ एका छोट्या जीवाची नव्हे, तर संपूर्ण पर्यावरणव्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

‘मुंगी हा आकाराने छोटा पण पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा जीव आहे. जमिनीच्या आरोग्यापासून अन्नसाखळीपर्यंत प्रत्येक स्तरावर त्यांचे योगदान असते. वारुळे कमी होणे म्हणजे परिसंस्थेतील असमतोलाची घंटा आहे.’
– प्रा. पूजा सोनसाळे, पर्यावरण अभ्यासक

सव्हाना गवताळ प्रदेशातील वृक्षारोपणाचे पक्षी जीवनावर संमिश्र परिणाम; संशोधकांचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष

‘शेतात फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा सर्वाधिक फटका मुंग्यांना बसतो. ही रसायने थेट त्यांचा नाश करतात किंवा त्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम करतात. त्यामुळे वारुळे टिकून राहत नाहीत.’
– सुरज जाधव, शेतकरी

Web Title: The vanishing world of ant mounds a grave warning of environmental imbalance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • navarashtra special story
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!
2

Snooker-बिलियर्ड्सच्या पटलावर पुना क्लब मॅजीशियन्स्‌‍चा दबदबा; सलग सामन्यांत ५-० असा दणदणीत विजय!

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
3

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व
4

Right To Know: लोकशाही बळकट करणारा आणि नागरिकांना सक्षम बनवणारा आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचे मूळ उद्देश आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.