देशातील 'या' अर्थमंत्र्यांनी घेतले होते ऐतिहासिक निर्णय
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी देशाचा सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कर स्लॅबमध्ये बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे.2019 पासून ते आत्तापर्यंत त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून आला आहे. निर्मला सीतारामन यांच्या आधीच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी अनेक मोलाचे निर्णय घेतले आहेत. चला तर जाणून घेऊया देशातील आधीच्या अर्थमंत्र्यांनी घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय.
देशातील ‘या’ अर्थमंत्र्यांनी घेतले होते ऐतिहासिक निर्णय
निर्मला सीतारामन या देशाच्या सातव्यांदा अर्थमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी 2019 पासून ते आत्तापर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये रस्ते, रेल्वे आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी वाढीव तरतूद देऊन पायाभूत सुविधांवर भर घेण्यात आला आहे. तसेच 2012 मध्ये लागू करण्यात आलेला एंजल टॅक्स रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील ‘या’ अर्थमंत्र्यांनी घेतले होते ऐतिहासिक निर्णय
1990 ते 2014 पर्यंत पी चिदंबरम यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात 9 अर्थसंकल्प सादर केले. पी चिदंबरम यांनी सीमाशुल्क कमी करून आर्थिक विकासाला चालना दिली. तसेच लागू करण्यात आलेले कर कायदे अधिक सुलभ करण्यासाठी कार्यप्रणालीमध्ये बदल केले.
देशातील ‘या’ अर्थमंत्र्यांनी घेतले होते ऐतिहासिक निर्णय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती आहेत. पण त्याआधी त्यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
देशातील ‘या’ अर्थमंत्र्यांनी घेतले होते ऐतिहासिक निर्णय
यशवंत सिन्हा हे राजकारणी नेते होते. त्यांनी 1990 ते 1991 पर्यंत पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे अर्थ मंत्रालय सांभाळले. तसेच त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 1998 ते 2002 पर्यंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा अर्थमंत्री पद सांभाळले.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे अनेक निर्णय घेतले होते.