फोटो सौजन्य: iStock
World Photography Day 2024: जागतिक छायाचित्रण दिवस, दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभर हा दिवस साजरा करण्यात येतो. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या, छंद जपणाऱ्या लोकांना हा दिवस समर्पित केला जातो. असे म्हणतात की, एक फोटो हजार शब्द बोलून जातो, त्यामुळे अनेक फोटोग्राफ्रर्स आपल्या कॅमेरात आठवणी कैद करून ठेवतात.
पूर्वी एक फोटो काढण्यासाठी लोकांना दूर जावे लागायचे पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे माहिती, कला आणि दळवळणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणला आहे. सगळ्यांकडे स्मार्ट फोन, कॅमेरा आहे. त्यामुळे कोणीही कधीही हवे तसे आठवणी कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकतात. फोटो आणि फोटोग्राफी कलेचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. आज आपण जागतिक छायाचित्रण दिनाचा इतिहास, आणि काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
जागतिक छायाचित्रण दिन इतिहास
जागतिक छायाचित्रण दिनाची सुरुवात 19 ऑगस्ट, 1839 रोजी झाली. या दिवशी फ्रान्सचे लुई डग्युरे आणि जॉर्ज ईस्टमन यांनी डॅग्युरिओटाइपचा शोध लावला होता. नंतर, फ्रेंच सरकारने 19 ऑगस्ट 1839 रोजी डॅग्युरिओटाइप तंत्रज्ञानाचा शोध लावल्याची घोषणा केली. फ्रेंच सरकारने हे तंत्रज्ञान सार्वजनिक केले आणि ते विनामूल्य वापरण्याची परवानगी दिली होती. त्या दिवसापासून हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस फोटोग्राफी प्रेमींना चांगल्या फोटोग्राफीसाठी प्रेरित करण्याची आणि याद्वारे समाज, कला आणि विज्ञानावर त्याचा प्रभाव अधोरेखित करण्याची संधी आहे.
पहिला फोटो कधी, कोणी आणि कसा काढला?
जगातील पहिले छायाचित्र 1827 मध्ये फ्रेंच शोधक जोसेफ निसेफोर निपसे यांनी काढले होते. या ऐतिहासिक छायाचित्राला ‘हेलियोग्राफी’ किंवा ‘हेलिओटाइपी’ म्हणतात. याला ‘ल ग्रास येथील खिडकीतून दृश्य’ असे म्हणतात. हा फोटो खिडकीच्या बाहेरचे दृश्य दाखवतो आणि एका विशेष प्रकाशसंवेदनशील प्लॅटिनमवर कॅप्चर केले गेले होते, जे सुमारे आठ तासांनंतर स्थिर होते. नंतर अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियसने यांनी 1839 मध्ये जगातील पहिला ‘सेल्फी’ क्लिक केला होता. तेव्हा सेल्फी म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हते.
नंतर,या फोटोग्राफीच्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमध्ये सतत विकास होत गेला. नंतर 19 ऑगस्ट 2010 हा फोटोग्राफी उत्साही किंवा व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी पहिली जागतिक ऑनलाइन गॅलरी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 250 हून अधिक छायाचित्रकारांनी त्यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांचे विचार शेअर केले होते. ही ऑनलाइन गॅलरी जगभर प्रसिद्ध झाली.
जागतिक छायाचित्रण दिन 2024 थीम: “एक संपूर्ण दिवस”
आजचा दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी एक संपूर्ण दिवस अशी या दिवसाची थीम ठेवण्यात आली आहे. यासाठी अनेक ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या फोटोग्राफीच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. जगभरात एकाच दिवसात काय घडते ते कॅप्चर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सहभागींना 19 ऑगस्ट 2024 रोजी फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी आणि ते शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाते. जगभरातील विविध ठिकाणे, संस्कृती आणि क्षणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमांचा संग्रह तयार करणे हे ध्येय आहे.