ममता बॅनर्जींविरुद्ध ईडीची हायकोर्टात धाव (फोटो -सोशल मीडिया)
ईडीची ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध हायकोर्टात धाव
आज ईडीने केली होती पश्चिम बंगालमध्ये छापेमारी
ममता बॅनर्जी पुरावे घेऊन गेल्याचा ईडीचा आरोप
West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. नेमके काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात. आज ईडीने पश्चिम बंगालमध्ये I-PAC च्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी त्या ठिकाणी जाऊन तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
ईडीने I-PAC चे प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर छापेमारी केली. छापेमारी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यानंतर ईडीने पश्चिम बंगाल सरकारवर आणि खुद्द मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुरावे नेल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली असून शुक्रवारी ईडीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
ईडीचा आरोप काय?
छापेमारी सुरू असताना त्या ठिकाणी दक्षिण कोलकाताचे डीसीपी आणि आणखी एक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर कोलकाता पोलिस कमिशनर फौजफाटा घेऊन तिथे पोहोचले. त्यांना यांच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्र आणि या छापेमारीबाबत देखील सांगितले.
सर्च ऑपरेशन सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या पोलिस बंदोबस्तांसह तेथे दाखल झाल्या. ममता बॅनर्जी प्रतीक जैन यांच्या घरी दाखल झाल्या आणि घरात घुसून कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असे पुरावे त्या घेऊन गेल्याच आरोप ईडीने केला आहे. यामुळे ऑपरेशनमध्ये बाधा निर्माण झाल्याचे ईडीने म्हटले.
ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
आज ईडीने I-PAC कार्यालयावर छापेमारी केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठेतया कार्यालयात दाखल झाल्या. तिथून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यंत्रणेच्या माध्यमातून बंगालचा डेटा आणि रणनीती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कारवाईमुळे पश्चिम बंगालमध्ये जितक्या जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले होते ते आता शून्यावर येईल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
ज्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे, त्या ठिकाणी तृणमूल कॉँग्रेसच्या महिला नेत्यांनी बंगालचे राज्यगीत गाऊन अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्याशी लढायचे असेल तर, लोकशाही पद्धतीने आम्हाला पराभूत करा. यंत्रणेच्या मागे लपू नका.” तपास यंत्रणा निवडणूक आणि आपल्या पक्षाशी संबंधित महत्वाचे कागदपत्र आणि कॉम्प्युटर आणि हार्डडिस्क जप्त करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.






