महिला सशक्तीकरणाला चालना देणारी 'आदित्य अनघा' ; बॅंकिग क्षेत्रातील टॉप 10 मध्ये संस्थेचा समावेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आदित्य अनघा ही एक बहु-राज्यीय पत सहकारी संस्था आहे. ही संस्था आज बॅंकिंग क्षेत्रातील टॉप 10 मध्ये समाविष्ट झाली आहे. बहु-राज्य पत सहाकारी संस्था म्हणून काम पाहणारी ही संस्था महिला सक्षमीकरणात आघाडीवर आहे. आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिच को-ऑप सोसायटी लिमिटेट ही संस्था सहकार क्षेत्रात मजबूत पाया रोवत आहे. 2 ऑक्टोरबर 2011 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसग़ड आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये 88 शाखांसह कार्यरत आहे. ही संस्था सतात्याने प्रगतीच्या दिशेन वाटचाल करत आहे. श्रीमत अनघा समीर सराफ या आदित्य अनघा संस्थेच्या संस्थापक म्हणून कामकाज पाहतात.
केवळ सात कर्मचाऱ्यांसह सुरु झालेल्या या संस्थेत आता 720 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या संस्थेने आज 3 लाखांहून अधिक सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. आज या संस्थेकडे 1300 कोटी रुपायांच्या ठेवी आहेत. संस्थेने 600 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. तसेच 62 कोटींचे शेअर कॅपिटल आणि 151 कोटींची गुंतवणूक आहे. संस्थेकडे 500 कोटींची मालमत्ता आहे. ही संस्था केवळ भौगोलिक नव्हे तर व्यावसायिक दृष्टीकोनातूनही विस्तारली पाहिजे, असे श्रीमती अनघा सराफ यांचे मत आहे.
यासाठी त्यांनी संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी 7 दिवसांचे विशेष अनिवार्य प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा, 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या किफायतशीर दरामध्ये गृहकर्ज सुविधाही देण्यात आल्या आहेत. दरवर्षी 20 उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना विदेश दौऱ्यावर नेण्यात येते. तसेच वर्षातून एकदा कर्मचाऱ्यांच्या आरोगय तपासणीचीही व्यवस्था केली जाते.
महिला सशक्तीकरण हे संस्थेचे धेय्य आहे.या संस्थेने 3200 हून अधिक दैनिक प्रतिनिधींना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे.आधुनित तंत्रज्ञानाच्या मदतीने एक मोबाईल ॲपदेखील या प्रतिनिधींना देण्यात आले आहे. तसेच दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी स्थापना दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्म देखील आयोजित केले जातात. यामध्ये सहकारी आनंदाने सहभागी होतात.
आदित्य अनघा ही संस्था महिला नेतृत्वात आघाडीवर आहे. तसेच पारदर्शक प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सामाजिक बांधिलकी जपून संस्थेने सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेला देशातील टॉप 10 क्रेडिटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय गो ग्रीन गो नीम मोहीमेंतर्गत, संस्थेने 2 लाख नीमच्या झाडांची लागवड केली आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 10 वी आणि 12 वीच्या गुणवंत विद्यार्थांचा देखील गौरव केला जातो. संस्थेच्या उत्कृष्ट कार्यामुळे आदित्य अनघा यांना फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून सर्वोत्कृष्ट संघटना पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणखी इतर संस्थांनी देखील त्यांचा सन्मान केला आहे.