इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 70 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. कोलकाताचे 14 सामन्यांमध्ये 20 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्स साखळी सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्सला 14 सामन्यांत 17 गुण मिळाले पण संजू सॅमसनचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
काल सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्ससोबत सामना झाला. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने 4 विकेट्सने पंजाबचा पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचे देखील 17 गुण आहेत परंतु त्याला चांगल्या नेट रन रेटचा फायदा मिळाला आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघाला एलिमिनेटर 1 सामना खेळणार आहे. क्वालिफायर 1 सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल तर पराभूत संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघाशी लढायला लागणार आहे.
[read_also content=”विराट कोहलीने ख्रिस गेलला दिली खास भेटवस्तू https://www.navarashtra.com/sports/virat-kohli-gave-a-special-gift-to-chris-gayle-535488.html”]
क्वालिफायर सामान्यांचे वेळापत्रक
क्वालिफायर 1 चा सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रंगणार आहे. तर एलिमिनेटर सामना हा 22 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाचा सामना एलिमिनेटर सामन्यांमध्ये विजयी झालेल्या संघाशी होणार आहे. एलिमिनेटर सामन्यांमध्ये पराभूत झालेला संघ शर्यतीतून बाहेर होईल.