
अभिजीत, आयुष, दिनेश यांची आगेकूच
विनायकी क्रीडा महोत्सव; राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
पाषाण सुस रोड, पुणे येथे सुरू आहे विनायकी क्रीडा महोत्सव
पुणे: सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने व माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विनायकी क्रीडा महोत्सवाअंतर्गत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अभिजीत त्रिपणकर, आयुष गरुड, दिनेश केदार यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम, सनिज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत जागतिक विजेत्या पुण्याच्या अभिजीत त्रिपणकर याने आपला शहर सहकारी विघ्नेश कोर्बोल्लूचा २५-००, २५-०० असा एकतर्फी पराभव केला. पुण्याच्या आयुष गरुडने छत्रपती संभाजी नगरच्या सचिन केळकरचा २५-००, २५-०६ असा तर, मुंबईच्या दिनेश केदार याने मुंबई उपनगराच्या सुधाकर अय्यरचा २५-०५, २५-०४ असा पराभव करून आगेकूच केली.
पुण्यात कॅरमचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त १८२ खेळाडूंची रंगणार टक्कर; लाखो रुपयांची बक्षिसे
संदीप कदम यांच्या हस्ते उद्घाटन
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण कदम, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भारत देसलडा, यतीन ठाकूर, जयवंत नलावडे, खजिनदार अजित सावंत, सुशील गुजर, आशुतोष दोडमिसे, एमसीएचे उपाध्यक्ष मंजूर खान, स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते, नरेंद्र पाटणकर रेफ्री केतन चिखले, आशिष बागकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल : पहिली फेरी :
किरण पवार (ठाणे) वि. वि. आशुतोष खडसे (पुणे) 25-03, 25-00;
किरण लोंढे (सांगली) वि. वि. यश काकडे (पुणे) 19-14, 25-05;
सुधाकर अय्यर (मुंबई उपनगर) वि. वि. सोहम जाधव (पुणे) 24-04, 23-00;
इम्तियाज हुन्नुरे (पुणे) वि. वि. संजय पाटील (ठाणे) 25-00, 25-00;
सचिन बांदल (पुणे) वि. वि. अफान गझगे (रायगड) 25-06, 25-00;
दिपक पतंगे (मुंबई) वि. वि. आकाश भोईटे (पुणे) 12-17, 25-06, 22-04;
आयुष काटकर (ठाणे) वि. वि. विकी दास (पुणे) 22-11, 25-07;
रघुनाथ पाटील (जळगाव) वि. वि. फैयाज खान (पुणे) 25-08, 10-25, 25-05;
संदीप साळुंखे(पुणे)वि.वि.गौतम जाधव(मुंबई उपनगर) 25-07, 25-02;
Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद
दुसरी फेरी :
आयुष गरुड (पुणे) वि. वि. सचिन केळकर (छत्रपती संभाजीनगर) 25-00, 25-06;
चेतन कोळी (मुंबई) वि. वि. दत्तात्रय गायकवाड (मुंबई) 25-00, 25-00;
सलमान खान (मुंबई) वि. वि. किरण लोंढे (सांगली) 25-00, 25-09;
अभिजीत त्रिपणकर (पुणे) वि. वि. विघ्नेश कोर्बोल्लू (पुणे) 25-00, 25-00;
दिनेश केदार (मुंबई) वि. वि. सुधाकर अय्यर (मुंबई उपनगर) 25-05, 25-04;
संजय मणियार (मुंबई उपनगर) वि. वि. सचिन बांदल (पुणे) 24-14, 23-10;