राज्य मानांकन कॅरम स्पर्धा (फोटो- istockphoto)
सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना दर्जेदार स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कॅरम हा एकाग्रता, कौशल्य आणि संयम विकसित करणारा खेळ असून, राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची ही उत्तम संधी आहे. भविष्यातही विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन कटिबद्ध राहील.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा खेळवण्यात येणार असून, दोनही गटातील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष एकेरी गटात १६० तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अभिजित त्रिपनकर तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवारून सामान्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी
माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘विनायकी क्रीडा महोत्सव’ अंतर्गत खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत विविध वयोगटांतील बालखेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. यामध्ये रिधान सिंग, आश्वी नागदा, स्वानंद दास, ध्यानम त्रिवेदी, धन्वी पाठक, श्रुवी दुधाने आणि आहिरा खिलारे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून यश संपादन केले. पाषाण-सुस रस्त्यावरील ‘सनीज वर्ल्ड’ येथील ‘पेरी डॉट हॉल’मध्ये ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ६ वर्षांखालील विशेष मुलांच्या क्वॉड प्रकारात ‘चॅम्पियन स्केटिंग क्लब’च्या रिधान सिंग याने प्रथम क्रमांक पटकावला. रिधान हा पवार पब्लिक शाळेत वरिष्ठ शिशुवर्गात (सिनियर केजी) शिकत आहे.
Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट






