Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma: अभिषेक शर्माची वेदना! माजी कर्णधाराचे द्रवले मन, कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या संघर्ष करत असून, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या कठीण काळात त्याला पाठिंबा दिला आहे. झिम्बाम्ब्वे दौऱ्यात अभिषेकची बॅट अजिबात चालली नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 27, 2026 | 02:09 PM
अभिषेक शर्माने स्वतःच्या खेळीवर व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिषेक शर्माने स्वतःच्या खेळीवर व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मा झिम्बाम्ब्वेमध्ये ठरला अपयशी 
  • सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना 
  • टीमचे केले कौतुक, पण सूर्यकुमारच्या शब्दांनी वेधले लक्ष 
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या धावांच्या बाबतीत संघर्ष करत आहे. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावांचा मोठा आकडा जणू अचानक थांबला आहे. २६ जुलै रोजी संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने तिन्ही सामन्यात मिळून केवळ ११ धावा केल्या. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली निराशा व्यक्त केली. 

अभिषेकची ही व्यथा पाहून माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला आणि त्यांने कमेंट्स सेक्शनमध्ये फलंदाजाला प्रोत्साहन देत पाठिंबाही दिला. सूर्यकुमार यादवसाठीदेखील हा अत्यंत कठीण काळ आहे. त्यामुळे त्याच्या या पाठिंब्याने अभिषेकला नक्कीच आधार मिळेल असा चाहत्यांचा विश्वास आहे. 

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश

अभिषेक शर्माने व्यक्त केली निराशा

अभिषेक शर्मा स्वतःच्या कामगिरीमुळे निराश दिसला. मालिका संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, “जेव्हा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाही, तेव्हा दुःख होते. पण जे कठोर परिश्रम करत राहतात, त्यांना क्रिकेट नेहमीच संधी देते. संघ जिंकला याचा मला आनंद आहे. मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परत येईन.”

सूर्यकुमार यादवने दिला पाठिंबा

माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या पोस्टमागील वेदना समजून घेतली आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यातील आपल्या खेळीची आठवण करून देत, त्याने कमेंट्स सेक्शनमध्ये लिहिले, “गेल्या दोन वर्षांत, तू आपल्या देशबांधवांना चेहऱ्यावर हसू येण्याची अनेक कारणे दिली आहेस. जेव्हा भारताला तुझी सर्वाधिक गरज होती, तेव्हा तू उत्कृष्ट कामगिरी केलीस. ही फक्त वेळेची बाब आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि नेहमी निर्भयपणे खेळ.”

सूर्यकुमार यादवच्या या कमेंटनंतर, युजर्सनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. बहुतेक जणांचे म्हणणे आहे की, संघात नसतानाही सूर्या आपल्या सहकारी खेळाडूंची काळजी घेतो, ज्यामुळे तो एक खरा आणि उत्तम लीडर ठरतोय. 

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?

अभिषेक शर्मा खराब फॉर्ममध्ये

झिम्बाब्वेविरुद्धची टी२० मालिका सुरू होण्यापूर्वीच अभिषेक शर्मा संघर्ष करत होता. त्याने आयर्लंडविरुद्ध ४९ आणि ० धावा केल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध ५९, ४३, १०, १६ आणि ३ धावा केल्या. त्यानंतर त्याने १, ८ आणि २ अशा गुणांसह झिम्बाब्वे दौरा संपवला. याचा अर्थ असा की, तो त्याच्या शेवटच्या १० सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अभिषेक शर्मा स्वतःदेखील आपल्या कामगिरीवर अजिबात आनंदी नाही हेच त्याच्या या पोस्टमधून दिसून येत आहे. मात्र तो नक्कीच धडाक्यात पुनरागमन करेल असा अनेकांना विश्वास आहे. 

Web Title: Abhishek sharma shared post after zimbabwe tour end suryakumar yadav commented and pour love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS ZIM
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
1

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
4

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.