भारत विरुद्ध इंग्लंड (फोटो- सोशल मिडिया)
श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून भारताला एकही विजय प्राप्त झालेला नाही. अभिषेक शर्मा संपूर्ण दौऱ्यात सातत्याने रन्स करताना दिसून येत आहे. आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्माच्या नावावर मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने आधीच २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.
आजच्या चौथ्या सामन्यात टी 20 फॉर्मटमध्ये अभिषेक शर्माकडे सलामीवीर म्हणून 350 सिक्स पूर्ण करण्याची संधी असणार आहे. सध्या त्याने सलामीवीर म्हणून आतापर्यंत 348 सिक्स मारले आहेत. आज केवळ 2 सिक्स मारताच अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून 350 सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तर इशान किशन देखील आज आपल्या नावावर नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. इशान किशन टी 20 क्रिकेटमध्ये 7000 रन्स पूर्ण करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. केवळ 4 रन्स करताच इशान किशन टी 20 मध्ये आपल्या 7000 रन्स पूर्ण करणार आहे. त्याच्या नावावर सध्या 6996 रन्स आहेत.
आजच्या सामन्यात चाहत्यांना दोन मोठे विक्रम पाहायला मिळू शकतात. इशान किशन आणि अभिषेक शर्माकडे आज आपल्या नावावर रेकॉर्ड करून घेण्याची संधी असणार आहे. इशान किशन गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. मात्र आज त्याच्याकडे 7000 रन्स पूर्ण करण्याची संधी असणार आहे.
अशी कशी झाली दैना! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात Team India अडचणीत; आयसीसी रँकिंगमध्ये थेट…
भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग






