वानिंदू हसरंगा आणि अबरार अहमद(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मधील तिसऱ्या सुपर ४ सामन्यात काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाची आशिया कपमध्ये आतापर्यंत निराशाजनक राहिली होती. तसेच पाकिस्तान संघ भारताविरुद्ध सलग दोन वेळा पराभूत झाल्यामुळे त्याच्यावर नामुष्की ओढवली होती. आता श्रीलंकेविरुद्ध देखील पाकिस्तानला आपमानचा सामना करावा लागला आहे. सुपर ४ च्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूची कृती त्याच्याच अंगलट आली आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs BAN: सुपर – 4 मध्ये भारताविरूद्ध बांगलादेशचा निभाव लागणार? कसा आहे रेकॉर्ड
पाकिस्तान-श्रीलंका सामन्यादरम्यान, मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने अबरार अहमदचा चांगलाच अपमान केला. वास्तविक पाहता हसरंगाची विकेट मिळवल्यानंतर अबरार अहमदने हसरंगाच्या सिग्नेचर स्ट्राईकची नक्कल करून खिल्ली उडवली होती. त्यानंतर हसरंगा देखील कशाला मागे राहतो. त्याने अबरारचा चांगलाच बदला घेतला.
जेव्हा हसरंगा गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याने पाकिस्तानी फलंदाजला बाद केले आणि त्याच पद्धतीने विकेट्सचा आनंद साजरा केला. अहमदला बाद केल्यानंतर, हसरंगा अबरारच्या शैलीतच त्याची विकेट साजरी करताना दिसून आला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
अबरार अहमदने मैदानावर वादाला तोंड फोडले. त्याने विकेट घेतल्यानंतर हसरंगाच्या प्रसिद्ध ‘सेल-फोन स्टाईल’ सेलिब्रेशनची नक्कल केली. ज्यामुळे अनेकांना आश्चर्यच वाटले. हसरंगा देखील काही गप्प बसला नाही आणि त्याने पाकिस्तानी फलंदाज सैम अयुबला बाद केल्यानंतरही त्याच पद्धतीने आपली प्रतिक्रिया नोंदनवली.
The wicket 🗿
The celebration 🗿🗿🗿 Wanindu Hasaranga is giving it back with interest 🔥 Watch #PAKvSL LIVE NOW on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/sKVxNygeBK — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2025
श्रीलंकेच्या हसरंगाने अबरारची नक्कल करून प्रतिक्रिया दिली. या दृश्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले. काहींनी ते खेळ भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्याकडे विनोद आणि मनोरंजन म्हणून पाहिले आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, पाकिस्तानने नाणेफेक जिंकला आणि श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंकेने १३३ धावाच केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने २८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १३४ हे लक्ष्य १८ ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि सामना खिशात टाकला.