मोहसीन नक्वींचे दिवस भरले? (फोटो - सोशल मिडिया)
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यापूर्वी, २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. आता महिला संघानेही त्याच पाऊलावर पाऊल ठेवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे.
एशियन क्रिकेट कौन्सिलच्या नियमांनुसार, अध्यक्षपद हे आशियाई देशांमध्ये आलटून-पालटून दिले जाते. नक्वी यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या आगामी बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आणि ACC मधील इतर सदस्य देशांचा नक्वी यांच्या कार्यपद्धतीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. रोटेशन धोरणानुसार, आता पुढील ACC अध्यक्षपद श्रीलंका किंवा बांगलादेशच्या प्रतिनिधीकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे.
IND-W vs SL-W : भारताने आठव्यांदा पटकावले महिला आशिया कपचे जेतेपद; श्रीलंकेवर 72 धावांनी मात
नेमका वाद काय आहे?
भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात मिळवलेल्या शानदार विजयानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास आणि नक्वी यांच्या हातातून सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. या राजकीय व क्रिकेटच्या वादात नक्वी यांनी भारतीय संघाच्या दोन ट्रॉफी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. क्रीडा जगतात या कृतीला अत्यंत असभ्य आणि खेळ भावनेच्या विरुद्ध मानले गेले असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ट्रॉफी चोर’ अशी टीका केली जाते.






