सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
T20 Mumbai League 2025 : देशात नुकतीच आयपीएल २०२५ ची स्पर्धा संपली आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जकहा ६ धावांनी पराभव करत पहिले विजेतपद जिंकले आहे.आता टी२० मुंबई लीग २०२५ चा थरार सुरू झाला आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने चांगलीच कमाल केली आहे. आता तो तितक्यावरच थांबला नसून त्याने आपला फॉर्म टी२० मुंबई लीग २०२५ मध्ये देखील कायम ठेवला आहे.
त्याने टी२० मुंबई लीग २०२५ मध्ये भाग घेतला आहे. ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टकडून खेळताना सूर्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तथापि, ४ जून रोजी लीगमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रायम्फ नाईट्स एमएनईचा ईगल ठाणे स्ट्रायकर्सकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे.
हेही वाचा : RCB Victory Parade Stampede: बंगळुरूत चाहत्यांचा मृत्यू पाहून सचिन तेंडुलकरचे तुटले मन, हळहळ केली व्यक्त
सूर्यकुमार यादव हा टी-२० मुंबई लीग २०२५ मध्ये खेळत असून तो ट्रायम्फ्स नाईट्स एमएनईचा कर्णधार आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध खेळताना सूर्याने फक्त २७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला आणि १८५.१९ च्या स्ट्राइक रेटने ५० धावा केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त, जागर राणाने देखील अर्धशतक लगावले आहे. त्याने ५३ धावा केल्या आहेत. त्याच्या संघाने ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या, प्रत्युउत्तरात स्ट्रायकर्सने फक्त १९.२ षटकात ही लक्ष्य पूर्ण केले. स्ट्रायकर्सकडून वरुण लवांडेने ५७ धावांची खेळी केली तर त्याला साई राज पाटीलची चांगली साथ मिळाली. पाटीलने ४७ धावा केल्या आहेत.
Suryakumar Yadav with a fifty in the Mumbai T20 League. pic.twitter.com/PMUMNkmHNb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 5, 2025
आयपीएल २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवने चांगली छाप पडली आहे. त्याने १६ सामन्यांमध्ये स्ट्राईक रेट १६७.९२ ने ७१७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६५.१८ होती. त्याने या हंगामात ६९ चौकार आणि ३८ षटकार मारले लगावले आहे. पहिल्या ५ सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये त्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट राहिला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो या हंगामातील त्याला “मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन” हा किताब मिळालाया आहे. आता सूर्यकुमार यादव सध्या मुंबई लीगमध्ये खेळत आहे, तो ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसणार आहे. भारत बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भाग घेणार आहे.