Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांना तिथेच ठोकून या……’; शोएब अख्तर पुन्हा बरळला; भारतीय संघ देणार का उत्तर

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रिड मॉडेलवर खूश नाही. दरम्यान, शोएब अख्तरने नाराज होऊन मोठे वक्तव्य वादग्रस्त केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 02, 2024 | 09:38 PM
Shoaib Akhtar's harsh words for India, Rohit's army will give a befitting reply

Shoaib Akhtar's harsh words for India, Rohit's army will give a befitting reply

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण प्रकरणावर खूश नाही. ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली असली तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याला मान्यता देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. पीसीबीला ही स्पर्धा संपूर्ण पाकिस्तानमध्ये आयोजित करायची होती, परंतु, ICC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका मवाळ झाली आहे. त्याचवेळी PCB आता भारतात होणाऱ्या ICCच्या सर्व स्पर्धाही हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवल्या जाव्यात, अशी मागणी करीत आहे. अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सहमत आहे की ही स्पर्धा आता हायब्रीड मॉडेलमध्ये होणार असल्याने पाकिस्तानला अधिक महसूल मिळायला हवा. पण, भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानने भारताचा दौरा करू नये हे त्याला मान्य नाही.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तर म्हणतो, ‘तुम्हाला होस्टिंगचे अधिकार आणि कमाई मिळत आहे, हे ठीक आहे. पाकिस्तानची मागणीही रास्त आहे. त्यांनी ठाम भूमिका ठेवायला हवी होती. जर आपण आपल्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू शकलो आणि ते (भारतीय संघ) यायला तयार नसतील तर त्यांनी अधिक महसूल वाटून घ्यावा. ही चांगली मागणी आहे.
पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा
पण, पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा, असेही अख्तर यांचे मत आहे. शोएब अख्तर पुढे म्हणाला, ‘भविष्यात भारतात खेळायचे झाल्यास मैत्रीचा हात पुढे करून तिकडे जायला हवे. माझा नेहमीच विश्वास आहे की भारतात जा आणि तिथे त्यांचा पराभव करा. ‘भारतात खेळा आणि तिथे त्यांना हरवून परत या’.
भारताचे सामने दुबईत होऊ शकतात
ताज्या अहवालांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबईमध्ये आयोजित केले जातील, तर उपांत्य फेरी (भारत जिंकल्यास) आणि अंतिम (भारत जिंकल्यास) तेथे खेळले जाऊ शकतात. जर भारत बाद फेरीत पोहोचला नाही तर उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये होतील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे. पण, त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पीसीबी यूएईशी बोलणार आहे. टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे भारत युएईमध्ये आपले सामने खेळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो.

पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC ने शुक्रवारी बैठक घेतली होती. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने तो पुढे नेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आता हायब्रीड मॉडेलसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया आपले सामने यूएईमध्ये खेळू शकते. पण त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.

हेही वाचा : अखेर पाकिस्तान नरमले; चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलद्वारेच होणार; महत्त्वाची अपडेट आली समोर

Web Title: Again shoaib akhtars harsh words for team india are rohits army will give a befitting reply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • India vs Pakistan
  • Shoaib Akhtar

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
4

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.