Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

Akashdeep and Mukesh kumar can loose their DSP job: बिहारचे खेळाडू आकाशदीप आणि मुकेश कुमार यांची नुकतीच डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता या दोन्ही खेळांडूच्या नोकऱ्या धेक्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 04:32 PM
Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
Follow Us
Follow Us:
  • आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची नोकरी जाणार?
  • बिहार सरकारने ठेवली मोठी अट
  • दोन्ही स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

बिहार सरकारने राज्यातील दोन मोठे सुपरस्टार, आकाशदीप आणि मुकेश कुमार यांचा एका भव्य कार्यक्रमात सन्मान केला. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दोन्ही खेळाडूंना डीएसपी पदाची नियुक्तीपत्रे दिली. आता याबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे.दोन्ही खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जर त्यांना बिहार पोलिसात दीर्घकाळ राहायचे असेल, तर त्यांना सरकारची ही अट मान्य करावी लागेल.

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

आकाशदीप आणि मुकेश कुमार यांच्या नोकऱ्या धोक्यात

सासारामचा रहिवासी असलेला आकाशदीप आणि गोपालगंजचा रहिवासी असलेला मुकेश कुमार हे सध्या बिहार पोलिसात डीएसपी आहेत. मात्र, बिहार सरकारने आता नुकत्याच सरकारी नोकरी मिळालेल्या खेळाडूंवर एक अट घातली आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, क्रीडा कोट्यातून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या खेळाडूंना पुढील पाच वर्षे त्यांच्या खेळाशी संबंधित सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल. त्यामुळे, आकाशदीप आणि मुकेश कुमार यांना आता टीम इंडियाचा भाग नसतानाही पुढील पाच वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. तंदुरुस्त झाल्यानंतरही ते असे करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना आपली डीएसपीची नोकरी गमवावी लागू शकते. त्या दोघांनी एकत्र बिहार पोलिस अधिकाऱ्यांची भेटही घेतली.

बिहार सरकारच्या २०२६ च्या रिक्रुटमेंट ऑफ आउटस्टँडिंग स्पोर्ट्सपर्सन रेगुलेशनच्या नियमावलीनुसार, नियुक्त खेळाडूंना नोकरीत रुजू झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षे सक्रिय खेळाडू म्हणून स्पर्धांमध्ये भाग घेणे बंधनकारक आहे. शासकीय सेवेत असताना क्रीडा क्षेत्रात सहभाग कायम ठेवणे अनिवार्य आहे. याचा अर्थ असा की, जर एखादा खेळाडू अटींनुसार क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकत नसेल, तर त्याची सेवा कायम करण्यात अडचणी येऊ शकतात. बिहार सरकारच्या ‘मेडल लाओ, नोकरी पाओ’, (‘पदक आणा, नोकरी मिळवा’) या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य आणि देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्त केले जाते.

दोन्ही स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

सध्या आकाशदीप आणि मुकेश कुमार दोघेही भारतीय संघातून बाहेर आहेत. दुखापतीमुळे आकाशदीप श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकला नाही. त्याच दुखापतीमुळे तो आयपीएल २०२६ मध्येही खेळू शकला नाही. मुकेश कुमार सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. आकाशदीप सिंग गेल्या वर्षी भारतासाठी खेळला होता. मुकेश कुमार शेवटचा २०२४ मध्ये भारतीय संघाकडून खेळला होता. तेव्हापासून तो पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

आकाशदीपने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध रांची कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि २०२५ मध्ये ओव्हल येथे भारतासाठी आपला शेवटचा सामना खेळला, तर मुकेश कुमारने २०२३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

Web Title: Akashdeep and mukesh kumar can lose their dsp jobs bihar government rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Bihar News
  • cricket news
  • dsp
  • Mukesh Kumar

संबंधित बातम्या

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
1

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
3

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
4

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.