पुणे : एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये मुलींच्या गटात आराध्या मीना, स्वरा जावळे, हरिणी हेमंत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल टेनिस कोर्ट
नवसह्याद्री क्रीडा संकुल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीनाने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करीत महाराष्ट्राच्या रेवा भातखलकरचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
हेमंतने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत केला प्रवेश
महाराष्ट्राच्या हरिणी हेमंतने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या उन्नती इंगोळेचा 6-2, 6-1 असा पराभव केला. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या स्वरा जावळे हीने गुजरातच्या काव्या शहाचे आव्हान 6-2, 6-1 असे मोडीत काढले. तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित नालयाझिनी के हीने महाराष्ट्राच्या शर्मिष्ठा कोद्रेवर 6-2, 6-2 असा विजय मिळवला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन एमएसएलटीएचे सदस्य, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, नवसह्याद्री सोसायटीचे खजिनदार वैभव संत, नवसह्याद्री सोसायटीच्या क्रिडा समितीचे सदस्य उमेश भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक केतन धुमाळ, शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे च्या केतकी जोगळेकर व सारिका गडदे, एआयटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल : मुख्य ड्रॉ : पहिली फेरी: मुली :
आराध्या मीना(1)(राजस्थान) वि.वि.रेवा भातखलकर(महा)6-0, 6-0;
सान्वी राजू(महा) वि.वि.आयरा अगरवाल 6-0, 6-1;
हरिणी हेमंत(महा) वि.वि.उन्नती इंगोळे (महा)6-2, 6-1;
स्वरा जावळे (8)(महा) वि.वि.काव्या शहा(गुजरात) 6-2, 6-1;
नालयाझिनी के(3)(तामिळनाडू) वि.वि.शर्मिष्ठा कोद्रे(महा)6-2, 6-2.