आंद्रे रसेल-अनन्या पांडे : कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 चा चॅम्पियन झाला. त्यानंतर त्यानंतर कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाचा मालक शाहरुख खान आणि त्याचा परिवार भावुक होताना दिसला. तर खेळाडूंनी त्यांच्या वेगवेगळ्या अंदाजात आनंद व्यक्त केला. आयपीएल 2024 चा फायनलचा सामना पाहण्यासाठी अनेक कलाकार आणि शाहरुख खानचा परिवार सुद्धा चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमला आला होता. सुहाना खान, आर्यन खान, अनन्या पांडे, जुई चावला यासारखे अनेक कलाकार स्टेडियमला उपस्थित होते.
[read_also content=”रिंकूच्या व्हिडीओ कॉलने केला मोठा खुलासा! 28 मे ला भारताचा दुसरा गट होणार अमेरिकेला रवाना https://www.navarashtra.com/sports/rinku-singhs-video-call-made-a-big-revelation-the-second-group-of-india-will-leave-for-america-on-may-28-539321.html”]
आयपीएल 2024 च्या फायनलनंतर कोलकाता नाईट राइडर्सच्या खेळाडूंसाठी मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे अनेक कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू, क्रीडा कर्मचारी आणि संघाशी संबंधित लोकांचे क्लब व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि कोलकाता नाईट रायडर्स जबरदस्त डान्स करत आहेत. शिवाय हिंदी गाण्यांवर नाचत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडू आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त चंद्रकांत पंडित जोरदार नाचत आहेत. मात्र, अनन्या पांडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. अनन्या पांडे सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे.
Andre Russell enjoying “Lutt Putt Gaya” Song during the IPL winning Party. ?? pic.twitter.com/Q8sg53FuFi
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2024
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट राइडर्सची कामगिरी
टी-20 विश्वचषक 2024 लवकरच सुरु होणार आहे. 2 जूनपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आले आहे. भारतीय संघातील पहिली तुकडी टी-20 वर्ल्ड कप साठी रवाना झाली आहे. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्याचबरोबर आज म्हणजेच 28 मे रोजी भारतीय संघाची दुसरी तुकडी अमेरिकेला रवाना होणार आहे.