Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिषेक शर्माबद्दल काय बोलून गेला अनिल कुंबळे? बॅटिंगमध्ये काढली मोठी चूक, म्हणाला, ‘अभिषेककडे परिपक्वता…’

अनिल कुंबळेच्या म्हणण्याप्रमाणे, वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत जसे केले, त्याचप्रमाणे अभिषेक शर्माला आपली आक्रमकता आणि जास्त वेळ क्रीजवर टिकून राहणे यात योग्य संतुलन साधण्याची गरज आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 19, 2026 | 09:00 PM
अभिषेक शर्माबाबत अनिल कुंबळेचे महत्त्वाचे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिषेक शर्माबाबत अनिल कुंबळेचे महत्त्वाचे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अनिल कुंबळेचे सडेतोड वक्तव्य 
  • अभिषेक शर्माबाबत केले मोठे विधान 
  • विरेंद्र सेहवागसह केली तुलना 
भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे मत आहे की, युवा सलामीवीर अभिषेक शर्माला, वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत जसा आक्रमकपणा आणि खेळपट्टीवर टिकून राहणे यात योग्य तो समतोल साधण्याची गरज आहे. हा २५ वर्षीय खेळाडू अलीकडच्या काळात आघाडीच्या फळीतील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक राहिला आहे. तो अनेकदा ‘उच्च जोखीम, उच्च परतावा’ या दृष्टिकोनाने आश्वासक सुरुवात करून देतो. मात्र, त्याला आपल्या वेगवान सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात बहुतेक वेळा अपयश आले आहे.

अनिल कुंबळे यावेळी म्हणाला की, “मी त्याची तुलना वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूशी करेन, कारण तो प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तो कसोटी क्रिकेटमधून एकदिवसीय क्रिकेट आणि नंतर टी-२० क्रिकेटमध्ये आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याला आपल्या खेळीची गती थोडी वेगळ्या पद्धतीने ठेवावी लागेल.”

पॅट कमिन्सच्या फिटनेसने वाढवली चिंता, SRH चे नेतृत्व करणार Abhishek Sharma? IPL 2026 मध्ये काय घडणार

मुलाखतीत केले विधान 

जिओ स्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल कुंबळेने आपले मत मांडले यावेळी तो म्हणाला की, “पण सेहवाग तरीही १४०-१५० च्या स्ट्राइक रेटने खेळायचा. अभिषेक शर्माने त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली पाहिजे.” त्याने स्वतःला विचारायला हवं, ‘मी २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे, अपेक्षा खूप जास्त आहेत, तर मग आता मी ३०० च्या स्ट्राईक रेटने खेळावं का?’ तुम्हाला फक्त सामान्य राहायचं आहे. तुम्हाला शक्य तितके जास्त चेंडू खेळायचे आहेत.’

कुंबळेच्या मते, ‘जर अभिषेक शर्मा एका डावात २० चेंडू खेळला, तर तो ५० धावांच्या जवळ पोहोचेल हे आपल्याला माहीत आहे. आपण संजू सॅमसनच्या बाबतीतही हेच पाहिलं आहे; तो ४० किंवा ५० धावांवर बाद होत नाही, उलट डाव पुढे नेतो आणि ८५-९० धावांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे त्याचा डाव अविस्मरणीय ठरतो.’

अभिषेकच्या खेळाकडून परिपक्वतेची गरज 

कुंबळे यावेळी म्हणाला की, ‘टी२० फॉरमॅटमध्ये अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज असते. कदाचित या हंगामात तुम्हाला अभिषेककडून अशीच परिपक्वता पाहायला मिळेल, ज्याची सनरायझर्स हैदराबादलाही अपेक्षा असेल.’ अभिषेकचा टी२० विश्वचषकातील प्रवास खराब होता, आणि आता तो २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. 

अभिषेकने स्वतः हे मान्य केले होते आणि आता आयपीएल सुरू होत असून अनेकांची अभिषेककडून अपेक्षा आहे. यामुळे अभिषेकने अत्यंत परिपक्वतेने हे हाताळावे आणि त्यानुसार खेळावे असेच यावेळी कुंबळेनेदेखील म्हटले आहे.

“हाच दिसतो का यांना फक्त…” संजू सॅमसनने ड्रेसिंग रूमचे केले सर्वात मोठे रहस्य उघड! वाचा नक्की प्रकरण काय?

Web Title: Anil kumble gave big advice to abhishek sharma compared with virender sehwag details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Anil Kumble
  • cricket news

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.